सिदखेडराजा/ रामदास कहाळे सिंदखेड राजाचे भूमिपूत्र आंबेडकरी चळवळीचे नेते त्यागमृर्ती स्मृतीशेष नागोराव जाधव यांच्या पूर्णींगीनी आमच्या घराण्याच्या आधारवड प्रेरणास्थान आडगावराजाच्या राणूजी काहाळे यांची सुकन्या , लक्ष्मण काहाळे (बिरबल) यांची भगीनी आमच्या मातोश्री विठ्ठाबाई नागोराव जाधव यांच्या १७ स्मृतीदीना निमित्त प्रयागबाई प्रभाकर म्हस्के, बाबासाहेब नागोराव जाधव, विमल बाबासाहेब जाधव, डॅा. योगेश बाबासाहेब जाधव, डॅा.श्रवंती योगेश जाधव, कुमारी मायरा,चिरंजिव रेयांश योगेश श्रवंती जाधव व संपूर्ण जाधव परिवार सिंदखेड राजा कडून आईस भावपूर्ण श्रध्दांजली, आदरांजली आईच्या फक्त आठवणी राहील्या काबाड कष्ट करून गवताचे भारे,टेंभूर्णीचे पाने, लाकडी मोळ्या,टींक, बरासी खंदून, तलावावर कामे करून ज्या मातोश्रीने ना घर ना दार असणाऱ्या त्यागी मानसाचा संसार करून पडीत शेत असलेल्या त्या मानसाच्या संसारात फूलमळा फुलविला व तो फूल मळा आज एव्हढा फुलला की, तो सातासमुद्रपार पसरला आणि तो आज आईच्या काबाड कष्टातून व आशिर्वादातून आमच्या घराण्याच्या रूपात फुलत बहरत आहे. अशा गरिबीवर मात करून संघर्षातून तू आम्हाला घडवीले खरोखरच आई तू धन्य आहे आई तूझ्या पोटी जर आम्ही जन्मललो हे आमचे भाग्य आहे . तूझ्या पोटी जन्मल्यामुळे हे आनंदी वैभवशाली जीवन आम्ही तूझ्या त्या काबाड कष्टा मुळे आम्हाला मिळाले आहे आई तू खरोखरच धन्य आहे असी आई सर्वांना मिळो असी त्या दयाळू बुध्दा जवळ प्रार्थणा करतो 🙏आज आईच्या १७ व्या स्मृतीदिनास विनंम्र अभिवादन करतो 👇. बाबासाहेब जाधव – दैनिक वृतरत्न सम्राट व दैनिक सामपत्र जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा, जिल्हा कार्यध्यक्ष- रिपाई आठवले, जिल्हाकार्यध्यक्ष शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती बुलडाा
