प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही : सिद्धार्थ खरात 

मेहकर/प्रतिनिधी (१८ ऑक्टोबर) मेहकर लोणार तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्कर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या वतीने कृषी वैभव लॉन मेहकर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात 57 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याला ११०० इच्छुकांनी हजेरी लावली, तर ६०० उमेदवारांना मुलाखती द्वारे थेट जाग्यावररच रोजगार मिळाला आहे, या मेळाव्याला उद्घाटक म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्रभाऊ खेडेकर,तर अध्यक्षपदी सिद्धार्थ रामभाऊ खरात होते,प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, निंबाभाऊ पांडव, दिपक मापारी, किशोरभाऊ गारोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपभाऊ वाघ ॲड.आकाशभाऊ घोडे अंकुर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, ॲड. संदीप गवई,संजीवनीताई वाघ, नगमाताई गवळी, शैलेशभाऊ बावस्कर, प्रदिप बिल्लोरे, सोपान देबाजे, कुणाल रावल, राजेश्वर गायकवाड भाऊराव बोरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते,कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या ,कृषी,बँकिंग फायनान्स ऑटोमोबाईल, इंजीनियरिंग, मेडिकल, कॉटन, बजाज, टाटा, डिलिव्हरी आणि सर्व्हिसेस, फर्टीलायझर,अशा जवळपास ५७ खाजगी कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय भव्य रोजगार मेळाव्याला सुमारे ११०० इच्छुकांनी भेट दिली. यातील ६०० उमेदवारांना मुलाखतीनंतर थेट नियुक्तीपत्र देण्यात आले, तर ५०० उमेदवारांनी निवड प्रक्रियेचा पुढचा टप्पा गाठला आहे. या मेळाव्यात उमेदवारांना दरमहा २० हजार पासून ते ५० हजार रुपये पर्यंत पगाराच्या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत

या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे १५०० उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी सुमारे ११०० इच्छुकांनी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला. नोंदणी केलेल्या इतर उमेदवारांना देखील लवकरच अपेक्षित नोकरी मिळेल, असा विश्वास उत्कर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला.

वास्तविक पाहता परम ,अशोक लेलेंड, एनआरबी,टाटा, होंडा, धुत,इसम इलेक्ट्रिकल, कॉस्मो फिल्म,यासारख्या मोठ्या कंपन्यांनी सिद्धार्थ खरात यांच्या विनंती वरुन पहिल्यांदाच मेहकर लोणार तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा रोजगार मेळावा म्हणजे, कॉर्पोरेट कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ आणि मेहकर लोणार तालुक्यातील सुशिक्षित उमेदवार यांना जोडणारा दुवा ठरला,असे सांगून, येथील तरुणांना आर्थिक स्थैर्य देण्याचा हा पहिलाच प्रयोग सिद्धार्थ खरात यांनी केला, ते अत्यंत हुशार आहेत त्यांना सामाजिक जाण भान आहे, विकासाची दृष्टी आहे जर त्यांना या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर निश्चितच विकासा पासून खितपत पडलेल्या या मतदार संघाचा विकासच होईल अशी ग्वाही प्रा नरुभाऊ खेडेकर यांनी या दिली तर आशिषभाऊ रहाटे यांनी सुद्धा अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले सिद्धार्थ खरात यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले तर आभार ॲड. आकाश घोडे यांनी मानले

 

 

 

“””””””””””””

मला कॉस्मो फिल्म कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळाली, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. या नोकरीने माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होईलच,तसेच माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी देखील ही नोकरी महत्त्वाची ठरेल, अशी प्रतिक्रिया या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या श्रद्धा दिलिप गवई हिने दिली.

“”””””””””””””””””””””

सुशिक्षित आणि कौशल्यपूर्ण तरुणाईला आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना देखील लोणार मेहकर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या टॅलेंटची नव्याने ओळख झाली. त्यामुळे अशाच रीतीने भविष्यात या भागातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही यापुढे या पेक्षा मोठ्या कंपन्यांना सोबत घेऊन नियमित रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात येतील, असा विश्वास सिद्धार्थ खरात व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *