सिंदखेड राजा/ रामदास कहाळे पंचायत समिती च्या जिजामाता सहभागृहामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे बौद्ध समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये दिनांक 2 एप्रिल ला सिंदखेडराजा शहरात बुद्धगया मुक्ती आंदोलना साठी भव्य असा शांती मोर्चा काढण्याचे ठरले असून यामध्ये हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले
बौद्ध गया येथील बुद्ध विहार हिंदूंच्या ताब्यात असून ते बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी दिनांक 2 एप्रील ला सकाळी साडेदहा वाजता भव्य असा शांती मार्च काढण्यात येणार आहे या मोर्चा चे नेतृत्व आणि नियोजन शासकीय सेवेत काम करणारे कैलास झिने आणि शिक्षक संतोष सोनुने यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या बैठकीमध्ये समाज बांधवांनी मोर्चाचे रुपरेषा कशी असावी याबद्दल चर्चा केली आणि विविध सूचना मांडल्या मोर्चा शांततेत निघणार असून मोर्चा शिस्तप्रिय निघणार असून सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यायचे येताना प्रत्येकांनी मेनंबत्ती घेऊन यायची पिण्याची पाण्याची व्यवस्था आदी बाबत चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे हा मोर्चा राजकीय विरहित राहणार असल्याचे यावेळी समाज बांधवांनी जाहीर केले या बैठकीला पंडितराव खंदारे भाई बबनराव म्हस्के, बाबुराव मोरे ,महेश जाधव, भाई दिलीप खरात, डॉ भीमराव म्हस्के ,ब्रह्मा पाडमुख, मेजर द्वारकादास म्हस्के, सचिन कस्तुरे ,भगवान साळवे ,शरद वाघमारे ,गौतम गवई ,अर्जुन काकडे, मधुकर शिंदे ,गजानन निकाळजे ,ससाने फौजी, राजू गवई ,सतीश तुरुकमाने ,विशाल लिहिणार समता सैनिक दलाचे सैनिक
यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते