https://vruttamasternews.com/buldhana-news-19/
वडीलांच्या द्वितीय स्मृतीदिनी मुलगी विमल,मुलगा पंडीत यांनी बुध्द विहारास दहा हजाराचे दिले धम्म दान
बुलडाणा-(प्रतिनीधी) –
बुलडाणा येथील से.नि.शिक्षण विस्तार अधिकारी विमल बाबासाहेब जाधव व जालणा येथील मुलगा से.नि.पोलीस इन्सपेक्टर पंडीत पुंडलीकराव इंगळे या बहीण भावांनी विचार केला की, से.नि. डिवायएसपी कालकथीत पुंडलीकराव जयराम इंगळे वडील यांचा व्दतिय स्मृतीदिन ५ जून २०२४ आहे ह्या स्मृतीदिन कार्यक्रमावर होणारा खर्च इतरत्र न करता धम्मचक्र बुध्द विहार साळेगाव रामनगर साखर कारखाना जालणा येथे भंते रेवत यांनी स्थापन केलेल्या धम्मचक्र चॅरिटेबल ट्रस्ट साळेगाव या चॅरुटेबल ट्रस्ट व्दारे भव्य असे बुध्द विहार बांधत आहे या बुध्द विहारास आपल्या वडिलांचा व्दतिय स्मृतीदिनाचा होणारा खर्च धार्मिक कामासाठी साळेगाव बुध्द विहारास देण्याचे ठरले. बहीण भावांनी जालणा येथील त्यांच्या गंगोत्री निवास स्थानी छोट्याखानी घरगुती कार्यक्रम आयोजित करून पुज्य भंते रेवत,भिक्खु यशोदिप व बालभंते सुंदसेन यांना आमंत्रित करून त्यांच्या हातून भगवान गौतम बुद्ध व बोधीसत्व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कालकथीत पुंडलीकराव इंगळे यांचा पुज्य भंते यांनी व्दतिय स्मृतीदिनाचा त्रिशरण पंचशील विधीवत पुजाकरून,परित्राणपाठ घेवून पुज्य भंतेना भोजन दान फल दान देण्यात आले व बुध्द विहाराच्या बांधकामास मुलगी विमल बाबासाहेब जाधव व मुलगा पंडीत पुंडलीकराव इंगळे यांनी प्रत्येकी पाच पाच हजार एकून दहा हजार रूपये भंते रेवत यांना बुध्द विहार बांधकामासाठी धम्म दान दिले.या आगोदर मुलगी विमल जाधव यांनी वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी बुलडाणा येथील आशोक काकडे निश्वार्थ चालवत असलेल्या सेवाभावी दिव्य सेवा अनाथालय प्रकल्पास १५ हजाराचे धान्य व किराणा माल दान दिला होता. विमल बाबासाहेब जाधव ह्या प्रत्येक आपले घरातील व्यक्तीचे वाढदिवस व इतर कार्यक्रम यांचे वरील आर्थिक खर्च इतरत्र खर्च न करता होणाऱ्या खर्चचाची रक्कम धार्मिक कामासाठी, शाळेत उपयोगी साहित्य, वाचनालयाला पुस्तके देवून कार्यक्रम साजरा करीत असतात.
बाबासाहेब जाधव बुलडाणा
९४२२५९१३२१