मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे भूमिपुत्र आमदार सिद्धार्थ खरात उद्या जिजाऊ दर्शनासाठी येणार

सिंदखेडराजा/ प्रतिनिधी मातृतीर्थ सिदखेडराजा तालुक्याचे भूमिपुत्र तथा मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधान भवन मुंबई येथे आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता

राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात येणार आहेत.

सिद्धार्थ खरात हे गेल्या पंधरा वर्षापासून उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेल्या जिजाऊ भक्तांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर मोफत शिव खिचडीचे वाटप करून माॅं साहेब जिजाऊंना दरवर्षी अभिवादन करतात आणि अशातच त्यांनी मंत्रालयात अव्वर सचिव पदाचा राजीनामा देऊन मातृतीर्थाचे नाव सार्थकी लावायचे या ध्येयाने प्रेरित होऊन आपण जर विधानसभेत गेलो तर निश्चितच आपण ख-या अर्थाने समाजाला न्याय देऊ शकतो आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे म्हणालेच आहेत ज्यांचा राजा असतो ती प्रजा सुखी असते अन् राजकीय वजन वापरून ही सर्व समस्याची चाबी होऊ शकते अन् इथुनच सर्व समस्या चे समाधान आणि गरजु यांना न्याय या साठी भूमिपुत्र सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर ते मुंबई ला विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी गेले होते . शपथ विधी झाल्यानंतर प्रथमच ते आपली कर्मभूमी मेहकर मतदार संघात जाण्यापूर्वी राष्ट्रमाता माॅं साहेब जिजाऊ यांना अभिवादन करणार आहेत, सोबतच क्रांतीज्योती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणार असल्याने मातृतीर्थ सिदखेडराजा तालुक्याचे चे भूमीपुत्र सिद्धार्थ खरात सिंदखेड राजा येथे येत असल्याने फुले शाहू आंबेडकर चळवळ आणि संत परंपरा वारकरी चळवळ ही एकमेकांस पूरक आहे आणि ही चळवळ समजून घेतली तर एकच आहे हे साहेब वेळोवेळी जनतेच्या लक्षात आणुन देत आहेत त्या मुळे राजकारणा पलिकडे जाऊन बघीतले असता मा. आमदार खरात साहेब हे धर्म निरपेक्ष आणि समतावादी समाजासाठी प्रेरणादायी ठरतील असे वाटते या मुळे मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिजाऊ चे दर्शन घेऊन त्यांची कर्मभूमी असलेल्या मेहकर मतदार संघाकडे रवाना होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *