बहुजन साहित्य संघाचे संमेलन मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न होणार, – ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र ही संत, साहित्यिक व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात की, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्रकारची रत्ने सापडतील फक्त ती माती ढवळण्याची शैली आपल्यात असणे गरजेचे आहे. याच अनुषगाने राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थ जिल्ह्यात साहित्यिकांनी येऊन आपली गगनभरारीची नाळ ही मातीशी जोडून ठेवावी म्हणूनच मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत सहित्यिकांची मांदियाळी व्हावी. या उद्देशाने विश्व फाऊंडेशन तसेच दैनिक लोकनेता परिवार यांच्या सौजन्याने बहुजन साहित्य संमेलन २०२५ आयोजित करण्यात यावे याकरिता दि. २० डिसेंबर २०२४ रोजी बहुजन साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी बहुजन साहित्य संघाची आढावा बैठक व पत्रकार परिषद सिंदखेड राजा शासकीय विश्राम गृहात घेतली होती..

 

या प्रसंगी संमेलामध्ये प्रस्तावित खालील विषयावर चर्चा झाली

 

१) बहुजन साहित्य संघाचे साहीत्य संमेलन २०२५ मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न व्हावे.

 

२) या साहित्य संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील मान्यवर साहित्यिक मंडळी, लेखक, कवी इत्यादींचा समावेश असावा.

 

३) या संमेलनासाठी परीसरातील नागरीकांसोबतच स्थानिक शासन प्रशासनाचा सुद्धा सहभाग असावा.

 

४) संमेलनाच्या पूर्वतयारी व संपन्नतेसाठी साहित्यिक व कार्यकत्यांची संमिती किंवा मंडळ असावे.

 

५) या संमेलना मध्ये वृत्तपत्रिय व वृत्तवाहीनी क्षेत्रामधील संपादक, पत्रकार, इत्यादी सर्व मान्य वरांचे सहभाग असावा.

 

६) या संमेलनासाठी सामिजिक, शैक्षणिक, सांकृतिक तसेच राज‌किय क्षेत्रातिल मान्यवराचे निस्पृह सहकार्य असावे.

 

७) या संमेलनाच्या निमित्ताने प्रस्तापितांच्या बरोबरच नवोदित लेखक, कवी, व साहित्यिकांना संधी मिळावी.

 

८) संमेलनातून मातुतिर्थ जिल्हाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी / परीसवांद व्हावा.

 

९) नागरीकांच्या मान‌वाधिकारांची तसेच संविधानादयारे मिळालेल्या मुलभूत अधिकार व कर्तव्ये याची ओळख नागरीकांमध्ये निर्माण व्हावी.

 

१०) संमेलनासाठी केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली यांचा सहभाग असावा.

 

११) मातृतिर्थ सिंद‌खेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ महिला विद्यापीठ असावे. यासाठी शासनाला साखडे घालावे.

 

१२) मातृतिर्थ जिल्हातील विश्व विख्यात लोणार सरोवराच्या विकासामध्ये सरोवराच्या डोंगरकड्यावरून पुर्व पश्चिम रोप वे असावा.

 

१३) मातृतिर्थ जिल्हामध्ये विमानतळ असावे. जगप्रसिद्ध लोणार तसेच शेजारीच अजिंठा लेणी असल्यामुळे जिल्ह्यात विमानतळ असावे.

 

१४) जिल्हातील राजुर घाटातील प्रचंड डोंगरकडे विचारात घेता तेथे सुद्धा रोपवे बनवून पर्यटनाची व्यवस्था व्हावी.

 

१५) बुलढाणा शहराला जडवाहनांच्या वाहतुकीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने चिखली रोड वरील साखळी फाट्यापासून पश्चिमे कडून शहराला वळसा घालणारा वळत मार्ग (बायपास), घाटामधुन घाट रस्ता बनवावा लागला तरी बनवण्यात यावा.

 

१६) सर्व सुशिक्षित व बेरोगार तरुणांना व महीलांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्याऱ्या योजना शासनाने त्वरेणे राबवाव्यात.

 

१७) मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीत मुला- मुलींचे शासकीय वस्तिगृह असावे.

 

इत्यादी विषयावर सदर बैठकीत प्रसंगोपात्त चर्चा करण्यात आली. संमेलनामध्ये हे विषय चर्चेत घेण्यात येणार असून या विषयावर संमेलनात भर देण्यात यावा ठरवले.

 

वरिल बैठकीस अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कथाकार डॉ. बबनराव महामुने, संभाजी नगर हे उपस्तित होते. प्रमुख मार्गदर्शन ब.सा. संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉ. विजयकुमार कस्तूरे चिखली यांनी केले. चर्चे मध्ये कवि अंकुश पडघान, बोरगाव काकडे चिखली, ज्ञानेश्वर बुधवत, मुख्यसंपादक दैनिक लोकनेता सिंदखेड राजा, पत्रकार सुरेश हुसे, पत्रकार राहुल झोटे, संजय सोनकांबळे, दिपक आखाडे, शिवाजी जाधव तथा इतर बऱ्याच मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.

—————–

बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या फोन द्यारे शुभेच्छा

 

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ॲड डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी ब. सा. संघाच्या वतीने साहित्य संमेलन २०२५ संदर्भात बैठक व पत्रकार परिषद बोलावली असल्याची माहिती मिळताच, प्रस्तावित साहित्य संमेलनाच्या आयोजनास सिंदखेड राजा उपविभागिय अधिकारी मा. प्रा. संजय खडसे यांनी ॲड डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना फोन द्यारे शुभेच्छा दिल्या व बहुजन साहित्य संमेलनासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *