https://vruttamasternews.com/buldhana-news-2/
ई व्हीएम घोटाळा केल्यास मी खून करणार
माजी मंत्री सुबोध सावजी यांची निवडणुक आयोगा ला दिला खळबळजनक इशारा
भारतात झालेल्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडीच्या पक्षाकडेच आहे या आधारे एकूण 48 जागेपैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटनार आहात असे घडल्यास
महाराष्ट्रातील मतदाराच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही माझे वय सध्या ८० वर्षाचे आहे आता दहा किंवा वीस वर्षे जगायचे आहे माझ्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड उघड खून करणार असाल मूडदा पा असाल तर मी या मतदाराच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागेपुढे पाहणार नाही लोकशाही च्या इतिहासात मी माझे नाव आजरामर करेल अशी आपला चेतवनी न देत आहे अशा प्रकारचा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणुक आयुक्त भारतीय निवडणुक आयोग दिल्ली यांना दिला आहे.