देऊळगाव राजा/ राजू भालेराव आसोला गावचे भूमिपुत्र प्रभाकर डोईफोडे यांनी मंत्रालय मधुन काही कालावधी साठी असोला जहागीर ला परत आपल्या गावी परतल्या नंतर त्यांनी गावातील गरीब गावकरी यांच्या स्वतःच्या जागा नमुना 8 वरील सरकार हा शब्द हा मुद्दाम लावण्याचा अंदाज आल्याने त्यांनी गट विकास अधिकारी यांची भेट घेतली, तहसीलदार यांची भेट घेतली कलेक्टर यांची सुद्धा भेट घेतली. 1982 ला प्लॉट अलाऊट झालेले होते त्याचे पुरावे,पावत्या गावकर्यांनी डोईफोडे साहेब यांच्याकडे जमा केल्या, डोईफोडे साहेब यांना प्रकार असल्याचे लक्षात आले, त्यांनी ऑक्टोबर 2023 ला पंचायत समिती देऊळगाव राजा या ठिकाणी अन्न त्याग करून आमरण उपोषण केले, त्यामध्ये गट विकास अधिकारी यांनी लेखी आश्वसन दिले, व चार कर्मचारी यांची समिती नेमली, एक वर्ष भर डोईफोडे यांनी पंचायत समिती ला वारंवार जाऊन सुद्धा काही होत नसल्याने, परत उपोषण करण्याचा निश्चय केला, आणि 2024 ऑगस्ट मध्ये ग्रामपंचायत असोला जहाँ येथे सहा दिवशीय आमरण उपोषण केले, त्यामध्ये परत समिती नेमून सरपंच चित्तेकर यांनी व सचिव सवडे यांनी व bdo यांनी 15 दिवसात सरकार काढण्यासाठी लेखी दिले व परत कारवाई साठी समिती नेमली,व उपोषण सोडले,दीड महिना होऊनही सरकार न काढल्याने सरपंच सुद्धा यामध्ये हलगर्जी करत असल्यामुळे ग्रामपंचायत ला कुलूप लावण्यात येईल असेल पत्र सुद्धा CEO बुलढाणा यांना देण्यात आले आहे. ग्रामपंचायत सरकार काढण्यासाठी हलगर्जी पणा करत आहे, आणि गावात कोणतेही काम न करताच बिले काडत असल्याचे पुरावे डोईफोडे साहेब यांच्याकडे आहे.उपोषण सोडल्या नंतर समितीने अहवाल bdo यांना दिला त्यामध्ये पऱ्हाड, भानुसे, सवडे यांच्यावर कारवाई एक ते चार दाखल होणार आहे, त्यानंतर समिती मध्ये पऱ्हाड यांना 2000 सालच्या अगोदर चे दप्तरं हजर करण्यासाठी नोटीस दिले असता, पऱ्हाड यांनी धोत्रा नंदाई चे ग्रामसेवक शेळके यांना गुपचूप दप्तरं असोला जहागीर ग्रामपंचायत मध्ये टाकण्यासाठी सांगितले, शेवटचे दोन दिवस बाकी असल्यामुळे डोईफोडे यांची नजर पूर्ण ग्रामपंचायत कडे असल्यामुळे सदर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक सवडे असताना शेळके कमरेत दप्तरं घेऊन आल्याची खबर मिळाली. सरकार धारक सतीश मुंढे यांनी ग्रामसेवक सुरेश शेळके यांना रंगेहात पकडले, व विडिओ व फोटो मुंढे यांनी काढत असताना ग्रामसेवक शेळके यांनी वाद केल्यानंतर शेळके दप्तरं घेऊन त्या ठिकाणा वरून दप्तरं परत घेऊन शेळके गेले, दुसऱ्या दिवशी डोईफोडे साहेब यांनी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा व bdo यांना तक्रार केली, त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई साठी समिती नेमली आहे.व लवकरच त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई होणार असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले,सर्व प्रकार गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मोहोर यांनी माहिती असून सुद्धा दीड वर्षात त्यांनी कारवाई तर केलीच नाही परंतु ग्रामसेवक यांच्या बदली च्या ऑर्डर असोला जहागीर ग्रामपंचायत ला काढल्या परंतु कोणीच चार्ज न घेतल्याने ग्रामपंचायत चे काम करण्यासाठी ग्रामसेवक नाही,कार्यरत ग्रामसेवक यांनी दीड महिन्यापासून सुट्टी टाकली असताना ग्रामसेवक हे पंचायत समितीला bdo यांच्याकडे दिसत असतात.कार्यरत ग्रामसेवक यांनी मेडिकल सुट्टी टाकलेली असतना पंचायत समिती ला काय करतात हा प्रश्न डोईफोडे साहेब यांनी वेक्त केला आहे.ग्रामपंचायत ला काम करायला ग्रामसेवक नाही, परंतु काम न करताच 12 लाख निधी काढल्याचे पुरावे प्रभाकर डोईफोडे साहेब यांच्याकडे आहे. ह्या सर्व गोष्टीकडे गट विकास अधिकारी यांनी दुर्लक्ष करत असल्यामुळे बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डोईफोडे साहेब यांनी अर्ज दाखल केला होता, त्यावर आशिष पवार डेप्युटी ceo यांनी कारवाई साठी पत्र काढले आहे, गटविकास अधिकारी असोला जहागीर ग्रामसेवक यांना व सरपंच यांना आदेश देऊन सरकार काढतील का? की सर्व भ्रस्ट ग्रामसेवक यांना पाठीशी घालून स्वतः निलंबित होतील या कडे लक्ष वेधले आहे.या प्रकरणात 2002 पासून ते आतापर्यंत कमित कमी या प्रकरणात हात असलेले 5 ग्रामसेवक व BDO निंलंबित होण्याची शक्यता असल्याची प्रभाकर डोईफोडे यांनी पत्रकार बांधव यांच्याशी बोलताना सांगितले.
