सिंदखेडराजा/ अनिल दराडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मृतिज्योत सालाबादाप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन विविध मान्यवरच्या हस्ते स्मुर्तीज्योत प्रज्वलित करून नायगाव कडे रवाना करण्यात आली
राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यापासू सावित्रीबाई फुले यांची स्मृतिजोत तसेच सजवलेल्या रथामध्ये सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा संपूर्ण सिंदखेडराजा शहरातून नगर प्रदक्षिणा करण्यात आली याप्रसंगी हजारो नागरिक महिला यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे गेली जय ज्योती जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या
या कार्यक्रमासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू खरात महाराष्ट्र माळी समाज अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव आढाव तसेच या संघटनेचे पदाधिकारी आकाश मेहेत्रे संजय ठाकरे भाऊराव ठाकरे रंजनराव केळकर राजू मेहेत्रे दत्ता खरात गणेश मेहेत्रे शिवाजी चौधरी एकनाथ मेहेत्रे जनाबापू मेहेत्रे सदाशिव मेहेत्रे या मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले दरवर्षी गेल्या सहा वर्षापासून हे कर्मचारी मंडळी नित्य नियमाने राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ नायगाव स्मृतिजोत काढतात