बुलढाणा /सचिन खंडारे सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील सुप्रसिद्ध गजलकार तथा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एजाज खान एजाज यांना 30 डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथील आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आली आहे ‘ दैनिक भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्याच बरोबर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी एजाज खान एजाज यांना त्यांच्या गझल साठी हा पुरस्कार मिळाला आहे एजाज खान हे गेल्या अनेक वर्षापासून गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपल्या गजलीचे सादरीकरण करून प्रतिसाद मिळवला आहे . त्याचबरोबर सुप्रसिद्ध गजल सम्राट भीमराव पांचाळे यांनी सुद्धा त्यांच्या गझल गायलेले आहेत ‘
यावेळी त्यांना उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे ‘ शेतकरी नेते रविकांत तुपकर ‘ साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड , साखरखेडा उपसरपंच सय्यद रफीक ‘ सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे ,माजी प्राचार्य संतोष दसरे ‘ एडवोकेट वर्षाताई कंकाळ ‘ उबरहंडे मॅडम ‘अमोल मोरे ‘ भाजपा प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे ‘ माजी केंद्रप्रमुख खंडारे सर ‘ ग्रामसेवक सोसायटीचे अध्यक्ष ललित शेठ अग्रवाल ‘ नितीन इंगळे ‘ यांच्या उपस्थितीमध्ये ‘ शाल श्रीफळ ‘ चमकती ट्रॉफी ‘ गोल्ड मेडल ‘ व पुष्पगुच्छ देऊन सदर पुरस्कार देण्यात आला ‘ माय भूमीत मिळालेला पुरस्कार हा इतर पुरस्कारापेक्षा वेगळा आहे अशी भावना यावेळी एजाज खान एजाज यांनी व्यक्त केली ‘ तर यापुढे सुद्धा आपण साहित्य क्षेत्रामध्ये आणखी जोमाने कामाला लागू अशी सुद्धा त्यांनी सांगितले ‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ‘