सिंदखेडराजा/ प्रतिनिधी जि. प. प्राथमिक शाळा सेलू येथे इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच उद्योग-व्यसायांची जाणीव व्हावी. त्यांना व्यवहार करण्याची संधी मिळावी तसेच पैसे कसे कमवायचे याचे
शिक्षण देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन श्री आबासाहेब एखंडे (उपसरपंच गटग्रामपंचायत सेलू-भोसा) यांनी केले. याप्रसंगी श्री.गणेश किंगर(सरपंच, गट ग्रामपंचायत सेलू-भोसा) श्री. भगवान एखंडे (अध्यक्ष, शा.व्य.स),श्री. प्रमोद रंधवे (उपाध्यक्ष, शा.व्य.स) श्री.अण्णासाहेब एखंडे(पोलिस पाटील सेलू) श्री.आत्माराम एखंडे(अध्यक्ष, तंटामुक्ती सेलू) तथा गांवकरी मंडळी उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्रसंचालन श्री. रामचंद्र कदम सर यांनी केले तर आभार
प्रदर्शन श्री.गजानन जायभाये (मुख्याध्यापक)
यांनी केले आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता
करण्यात आली.