स्नेहल सरकटे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ।

बुलढाणा /सचिन खंडारे 30 डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक हायस्कूलच्या प्रारंगणामध्ये दैनिक भारत संग्राम आयोजित स्व . मधुकरराव खंडारे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘ तसेच अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ‘

यामध्ये बुलढाणा येथील शिक्षिका व सध्या मोताळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक येथील सहाय्यक अध्यापक पदावर कार्यरत असलेल्या कु . स्नेहल सिद्धार्थ सरकटे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ‘ स्नेहल सरकटे ह्या उच्चशिक्षित असून ‘ होतकरू गरजू विद्यार्थ्यांना मुदत करणे ‘ शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करणे ‘ स्वच्छता ‘ शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण ‘ महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे ‘ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक वाढदिवस स्वखर्चाने साजरे करणे इत्यादी उल्लेखनीय कार्य त्यांनी केली आहे आणि याच कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ‘ सदर पुरस्कार शेतकरी नेते रविकांत तुपकर ‘ उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे ‘ साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड ‘ प्रवीण गीते ‘ यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे ‘ माजी केंद्रप्रमुख दिलीप खंडारे ‘ कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद रफिक साखरखेर्डा सोसायटीचे अध्यक्ष ललित शेठ अग्रवाल ‘ संदीप मगर ‘ संतोष दसरे ‘ अँड वर्षाताई कंकाळ उपस्थित होत्या ‘

पुरस्कार स्वीकारताना स्नेहल सरकटे यांच्यासोबत त्यांच्या आई राजेश्वरी सरकटे ‘वडील सिद्धार्थ सरकटे ‘ ( सेवानिवृत्त मुख्याध्यापक नगरपालिका शाळा क्रमांक २ ) तसेच मुलगी श्रेयसी सोबत होते ‘

खऱ्या अर्थाने आपल्या लेकीच्या कार्याचा गौरव होताना आई-वडिलांना अत्यंत हर्ष आनंद झाला होता ‘

त्यानंतर मोताळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे शाळेच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहल सरकटे यांचा दिनांक ३१ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला ‘ मोताळा केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ सुनीता शिंदे , यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला ‘ यावेळी मुख्याध्यापक गणेश जवरे ‘ विनोद चोपडे ‘ मीना उबरहंडे ‘ रूपाली बोरले ‘अंगणवाडी सेविका सौ मनीषा राजपूत ‘सौ ललिता पाटील ‘ ज्योती जवरे ‘ मदतनीस सौ करूणा इंगळे , रूपाली रेशवाल ‘शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदू कुकडे यावेळी उपस्थित होते ,

गेल्या 13 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये तन-मन धनाने विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहे . खरं म्हणजे निस्वार्थीपणाने दिलेल्या सेवेचे फळ मिळाल्याचा आनंद आहे ‘

पुरस्कार म्हणजेच काम करण्याचे ऊर्जा होय आणि ही ऊर्जा शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचं काम मी करणार आहे –

स्नेहल सरकटे ( सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *