सुलतानपूर /प्रतिनिधी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना सामाजिक जीवनात आम्ही मात्र सदैव त्यांच्या विचाराची दफन करत असतो. त्यासाठी
महापुरुषांचा विचार जोपर्यंत सत्यात उतरणार नाही तोपर्यंत खरा भारत उभा राहणार नाही
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट कार्यशाळा अंतर्गत सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर येथे आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त प्रविण गीते बोलताना रोख ठोक भूमिका मांडली . या कार्यशाळेचे आयोजन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे सह कै दुर्गा क विज्ञान महाविद्यालय लोणार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कार्यशाळेतून नव्या शैक्षणिक आवाहनाचा सामना करण्यासाठी आम्ही तत्पर असले पाहिजे,नव्या धोरणात्मक विषयाच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने पडणार हे एक सकारात्मक पाऊल असणार आहे,या भूमिकेतून वसंतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राध्यापक सौरभ गायकवाड,गजानन धांडे, महेंद्र भिसे,आकाश शेजुळ यांच्यासह सर्व शाळांचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक उपस्थित होते.. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते हे होते यावेळी गुरुकुल परंपरेपासून तर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापर्यंतचा शैक्षणिक प्रवास मांडला. शिक्षण हे आयुधा समान आहे. या आयूधाचा वापर करूनच नवा समाज उभा राहणार आहे. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन होऊ शकतं ही भूमिका आम्हा सर्वांना दिली. म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना सामाजिक जीवनात आम्ही मात्र सदैव त्यांच्या विचाराची दफन करत असतो. महापुरुषांचा विचार जोपर्यंत सत्यात उतरणार नाही तोपर्यंत खरा भारत उभा राहणार नाही अशी मौलिक भूमिका याप्रसंगी मांडली..