सिंदखेड राजा/ रामदास कहाळे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रणजित राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली असून यामधे तालुका अध्यक्ष, गजानन मेहेत्रे , कार्याध्यक्ष भगवान साळवे तर सचिव म्हणून बुद्धू चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी उर्वरित कार्यकारिणी करण्यात येणार आहे यावेळी शिवाजी मामलकर जिल्हा सचिव, केंद्रीय सदस्य रविंद्र फुलांने , जिल्हा निमंत्रक रामदास कहाळे यांच्या सह राहुल झोटे, एकनाथ म्हस्के, वसीम शेख, आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित राजपूत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की लोकशाही मध्ये सर्व पत्रकाराना समान न्याय या पद्धतीने जिल्हा पत्रकार संघात सन्मान केल्या जाईल त्याचा बरोबर पत्रकाराच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर असल्याच्या भावना रणजित राजपूत यांनी व्यक्त केल्या यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन मेहेत्रे, कार्याध्यक्ष भगवान साळवे, तर सचिव म्हणून बुद्धू चौधरी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते
