सिंदखेड राजा /प्रतिनिधी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील आंबेडकरी चळवळीचे युवा नेते भाई ब्रम्हा पाडमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 26 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार शाहीर कवी गायक राहुल अन्वीकर यांचा भीम गीतांचा भव्य संगीतमय कार्यक्रम रात्री 8 वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मनोज कायंदे, तर अध्यक्ष म्हणून भाई अशांत वानखेडे तर प्रमुख उपस्थिती भाई बबनराव म्हस्के ,भाई दिलीप खरात यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे यावेळी सकाळी दिवस भर विवीध समाज ऊपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जिजामाता नगर येथे सुभाष भाऊ जाधव मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य , नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून यामधे मोफत मुळ व्याध तपासणी, जुनाट अलर्जी सर्दी खोकला तपासणी, बालरोग व श्री तपासणी, मुतखडा तपासणी ,कान, नाक, घसा तपासणी,
संधिवात व सांधेदुखी, मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात मोतीबिंदू टेरिजियम सर्जरी, डोळ्यावरील पडद्याचे ऑपरेशन, दमा व पोटाचे विकार ,त्वचा रोग तपासणी,शिबिरामध्ये निवड झालेल्या व्यक्तीस अल्पदरामध्ये सुविधा देण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन जिजामाता हॉस्पिटल महिला आरोग्य केंद्र व जिजामाता नेत्रालय व सुभाष जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे की या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा व 26जानेवारी रोजी रात्री 8 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल अन्वीकर यांच्या भव्य भीम गीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाई ब्रह्म पाडमुख मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे