शेगाव/पंडीत परघरमोर आंबेडकरी व्हाईस मिडीया फोरम अर्थात AVMF या पत्रकार संघटनेच्या विद्यमाने मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन शेगाव शहरातील खामगाव रोडवरील हाॅटेल शिवांश सेलीब्रेशन येथे ३१जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी ११वाजता करण्यात आले असल्याची माहीती पंडीत परघरमोर प्रसिद्धी प्रमुख यांनी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातुन दीली आहे
आंबेडकरी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सविंधानीक रित्या स्थापन करण्यात आलेल्या या पत्रकार संघटनेचा हा पहीलाचं राज्यस्तरीय सोहळा होत असुन या सोहळा कार्यक्रम अध्यक्षस्थानी उत्तम वानखडे तर स्वागताध्यक्ष प्रकाश सरदार राहतील. सोहळ्याचे उदघाटन युवकांचे आयकाॅन तथा पत्रकार आद. सुजातदादा आंबेडकर यांचे हस्ते होणार आहे तर दादाभाऊ अभंग जेष्ठ पत्रकार यांचे मार्गदर्शन लाभनार आहे.तर मुख्य अतिथी म्हणुन गगन मलीक अभिनेते, अॅड. राजेश झाल्टे हे राहतील.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांना समाज गौरव ,जेष्ठ गायक आनंद शिंदे यांना जिवन गौरव तर जेष्ठ गायक राहुल अन्वीकर यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.सोहळ्या करीता बुलडाणा जिल्हाधिकारी किरण पाटील,जि.पो.अ. विश्व पानसरे,जि.माहीती अधिकारी पवन राठोड आदीं प्रशासकीय अधिकारी वर्गाची विशेष उपस्थीती राहील
या मूकनायक पत्रकार दिन सोहळ्यात विवीध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सन्मान,सत्कार,उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार मिळणार आहे.या कार्यक्रमाला आंबेडकरी व्हाईस मिडीया संघटनेत रीतसर सदस्य झालेले सभासद व पदाधिकारी असे राज्यभरातील जवळपास तीनशेच्या आसपास पत्रकार बांधव उपस्थीत राहणार आहेत. सोहळ्याला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध गायक महेद्रं सावंग यांचा एम.एस. म्युझीकल संच प्रबोधनाचा कार्यक्रम राहील.कार्यक्रमाला आंबेडकरी पत्रकारांनी आवर्जुन उपस्थीत राहावे असे आवाहन संघटनेचे महासचिव तथा मुख्य आयोजक देवचंद्र सम्दुर यांनी केले आहे.