अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्षपदी सचिन खंडारे यांची निवड ।

बुलढाणा/ प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारे तरुण तडफदार शेतकरी कष्टकरी विद्यार्थ्यांच्या समस्या सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देणारे ‘ पत्रकार सचिन खंडारे यांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ‘ सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांनी केली आहे ‘

दिनांक 23 जानेवारी रोजी साखरखेर्डा येथे झालेल्या बैठकीत सदर ही घोषणा करण्यात आली ‘ यावेळी कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे ‘ जिल्हा सचिव प्रल्हाद बापू देशमुख , सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष डॉक्टर गंगाराम उबाळे ‘ तालुका उपाध्यक्ष समाधान सरकटे ,पत्रकार राजेंद्र मोरे यांनी त्यांचा सत्कार केला ‘

या अगोदर सुद्धा त्यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघामध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम बघितले होते ,

२००७ पासून अगदी महाविद्यालयापासून सदर सचिन खंडारे

यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आहे .

शेतकरी कष्टकरी विद्यार्थी अनेक सामाजिक समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे ‘ त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ‘

 

तर आपण सर्व पत्रकारांना सोबत घेऊन पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सचिन खंडारे यांनी सांगितले .त्यांनी निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांच्या आभार मानले आहे ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *