https://vruttamasternews.com/buldhana-news-23/
सिंदखेडराजा तहसीलदाराकडून महीला सरपंचास मोजणी अहवाल देण्यास टाळाटाळ.
रेती प्रकरण अंगलट येण्याच्या भितीने अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा महीला सरपंचाचा आरोप.
सिंदखेडराजा/अनिल दराडे
. तालुक्यातील मौजे निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाट लिलाव क्षेत्रात मोजमाप करण्यासाठी महीला सरपंचाने आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर एकदाचे मोजमाप करण्यात आले मात्र सदर मोजमाप अहवालात महसूल चे अनेक कर्मचारी गोत्यात येणार असल्याने व स्वतः हे प्रकरण अंगलट येते का या भितीने तहसीलदार प्रविण धानोरकर हे अद्याप मोजमाप अहवाल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निमगाव वायाळ येथील महीला संरपच सौ शिलाबाई रामेश्वर चाटे यांनी केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाटातील क्षेत्रात लाखो ब्रास अवैध रेती उत्खनन झाले असून सदर रेती घाटातील अवैध मोजमाप करून दोषीं अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी वारंवार अर्ज निवेदन देऊन मोजमाप झाले नसल्याने अखेर महीला सरपंचाने 27 में रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर महसूल यंत्रणा सदर आत्मदहन आंदोलन मागे घेणयासाठी महसूल विभागाने सर्वस्वी करून ही महीला संरपच माघार घेत नसल्याने लोकसभा निकालाचे कारण देत 27 मे रोजीचे आत्मदहन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली यावेळी महीला सरपंचास 1 जून पर्यंत स्थगित केलयाने अखेर महसूल विभागाच्या हे प्रकरण अंगलट येणार असल्याने खुद्द जिल्हाधिकारी किरणं पाटील यांनी स्वतः सदर रेती घाटाची पाहणी केली यावेळी या परीसरात दोन हजार दोनशे ब्रास रेती चे साठे जप्त करण्याची सर्वात मोठी कारवाई केली यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाई चे आदेश दिले असताना ही प्रभारी उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस दिली पण् कारवाई करण्यात आली नाही मात्र या कारवाईत मोठे गोडबंगाल झाल्याची चर्चा परीसरात जोर धरीतआहे 30मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढाव शाखा अभियंता च्या नियंत्रणात अखेर निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाटाचे एकदाचे मोजमाप करण्यात आले असून सदर मोजमाप अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंदखेडराजा तहसीलदार,व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना 3 जुन रोजी अहवाल सादर करण्यात आला आहे मात्र सदर अहवालात अनेक महसूल अधिकारी व स्वतः तहसीलदार गोत्यात येणार असल्याने हा अहवाल महीला सरपंचास देण्यास तहसीलदार प्रविण धानोरकर टाळाटाळ करीत असल्याचे महीला सरपंचाने सांगितले.
सिंदखेडराजा येथील तहसिलदार प्रविण धानोरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अवैध रेती तस्करांना सोन्याचे दिवस आले असून तालुक्यातील काही तस्कर खुलेआम रेतीचे रात्रंदिवस उत्खनन करीत आहे तसेच त्यांनी जप्त केलेले रेती साठे त्याच तस्करांना वाटप करून रेती साठ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे योगदान त्यांनी केले आहे पाऊस पडून पाऊसाच्या पाण्याने नदीला आलेल्या पुराने हे खड्डे भरल्यास त्या आव्हालात गोंधळ करून वाचता येईल या साठी हा सर्व खटाटोप चालू आहे