देऊळगाव राजा/ प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका शैक्षणिक संस्थांसह विद्यार्थ्यांना मोफत वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी आयोजित केले आहे. यानिमित्त आज (ता.२६) जानेवारी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय समारंभात संविधान ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. दरम्यान प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांना संविधान व उद्देशिका वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यार्थ्यांना संविधानाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून मोफत संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारंभ २७ जानेवारी रोजी देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी बुलढाणा येथे संविधान ग्रंथाचे विमचन आणि प्राथनिधिक स्वरूपात श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे प्रा.मधुकर जाधव व विद्यार्थी विठ्ठल चव्हाण,अभिजित राजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज न प हायस्कूलचे विद्यार्थ्यांना ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार,उप जिल्हाअधिकारी समाधान गायकवाड, नगर विकास सह आयुक्त जी एस पेटे यांच्या हस्ते संविधान ग्रंथ वितरण करण्यात आले.