दुसरबीड/ सूरज कुटे: पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दुसरबीड येथे भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रकारच्या नृत्य तथा सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना घडविले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपोलो टायर्स कंपनीतर्फे शाळेतील सर्व विद्याथ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सरस्वती मखमले, पोलीस पाटील उर्मिला मखमले, मराठी
शहीद घुगे यांच्या मातोश्रींचा यथोचित सन्मान
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक शेख समीर अली यांच्या संकल्पनेतून दुसरबीड गावातील सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान प्रदीप घुगे यांना देशभक्तीवर आधारित गीतामधून शाळेतील चिमुकल्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांचे देखील डोळे भरून आले. या निमित्ताने शहीद घुगे यांच्या मातोश्रींचा ययोचित सन्मान करण्यात आला.
व उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य दुसरबीड केंद्राचे केंद्रप्रमुख रंगनाथ गावडे, मुख्याध्यापक रमेश वैद्य, जिल्हा परिषद ऊर्दू शाखेचे मुख्याध्यापक रफीक शेख,
अपोलो टायर्स कंपनीचे अधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका गावातील आजी व माजी सैनिक तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.