चिखली / प्रतिनिधी लक्ष्मीबाई आश्रमशाळा शिवणी आरमाळ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी
सुरुवातिला प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नारे दिले. त्यानंतर आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सुनील आरमाळ यांनी ध्वजारोहन केले.. त्यानंतर महापुरुषांच्या महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले…… त्यानंतर प्रा डी. आरमाळ.एन के पडघान यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित डॉ. करण गायके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दायी मार्गदर्शन केले.. आपण याच शाळेचे विध्यार्थी आहोत.. शाळा कोणती असू दया कठोर मेहनत करा यश तुमचेच आहे.. आज पन्नास लोकांचे कुटुंबाचे संसार मी चालवत आहे. विद्यार्थ्यांनी भाषणं गीत तसेच नृत्य केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन सदानंद मोरे यांनी केले.. तर आभार सुरेश जायभाये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर ए नागरे. आर एल चेके. सिद्धार्थ काळे. बी आर पवार. मोहन घोंगे. गणेश बनकर. ए डी राठोड. आर वी तेजनकर. एम बी झळके. विनोद आरमाळ शांताबाई शिंगणे. शालू झिने यांनी प्रयत्न केले