बुलडाणा,(प्रतिनिधी)- २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग, भारत सरकार आणि अनुसुचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्यची एकमेव मान्यता प्राप्त व कामगारांना संघर्षातून न्याय मिळवून देणारी न्यायासाठी सविधानाच्या मार्गाने झटनारी महाराष्ट्र भर एकमेव संघटना या कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटना बुलडाणा विभागाच्या वतीने एसटी कामगाराच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यअध्यक्ष धम्मपालजी ताकसांडे, राज्यसरचिटणिस सुनिलभाऊ निरभवने यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर राप विभागीय कार्यालयावर प्रलंबीत मागण्यासाठी निदर्शने करण्याचे आदेश होते त्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात विभागीय कार्यालयावर जिल्हा भरातून सात डेपो, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा येथील कास्ट्राईबचे पदाधीकारी, सभासद यांच्या उपस्थीतीत मा. राज्यउपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते पत्रकार बाबासाहेब जाधव , विभागीयध्यक्ष दिपक मिसाळकर, विभागीयसचिव भारत आराख, विभागीय कार्यध्यक्ष जीवन जाधव,विभागीय कार्यशाळाध्यक्ष महादेव पवार, सचिव नितीन नरवाडे, महीलाध्यक्ष लक्ष्मीताई बंड यांच्या नेत्तृत्वखाली खालील मागण्या घेऊन निदर्शने करण्यात आली व निवेदनाव्दारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष या प्रशासनाला मागण्याचे निवेदन विभाग नियंत्रक शुभांगीताई शिरसाठ यांचे मार्फत देण्यात आले. या निवेदनामध्ये कामगारांच्या प्रलंबित मागण्या,कामगारांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे पगारवाढ मिळाली पाहिजे,सन २०२४-२०२८ पगारवाढीचा कामगार करार करण्यात यावा ,एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेल्या वेतनाचा फरक घर भाडे भत्ता वाढीचा फरक महागाई भत्ता फरक देण्यात यावा, खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्याने,रा प चालकांना कामगिरी मिळत नाही त्यामुळे खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात येऊ नये ,मध्यवर्ती कार्यशाळेतील कामे बाह्य संस्थेकडून करून न घेता रा प कामगाराकडून करून घेण्यात यावी, रा प कामगारांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोफत प्रवास पास वर्षभरासाठी देण्यात यावा व सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, शिस्त व आवेदन कार्यपद्धतील पुनर्विचार करून जाचक बाबींचा पुनर्विचार करून सुधारणा करावी, राप कामगारांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशा ईतर विविध मागण्याचे विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व नंतर विभाग नियंत्रकांसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व वरिल मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी सर्वश्री बुलडाणा डेपोध्यक्ष रवि अवसरमोल, सचिव अशोक गवई, चिखली डेपोध्यक्ष प्रताप वानखडे, सचिव संतोष घेवंदे, मलकापूर डेपोध्यक्ष पी.पी.तायडे, सचिव राजू गुरचवळे, नितीन शेळके, सहसचिव सिध्दार्थ खराटे, जळगांव जामोद डेपोध्यक्ष एस.एस.कळमकर, सचिव आर.एस. तायडे, विभागीय कोषाध्यक्ष जीतेंद्र साळवे, मेहकर डेपोध्यक्ष विनोद वाकोडे, डेपोसचिव समाधान लहाणे, विभागीय महीलासचिव रेखाताई सपकाळ, विभागीय महीलाउपाध्क्षा कीर्तीताई दाभाडे (शेजोळ),अश्विनीताई जाधव, विमलताई जाधव, गजानन जाधव, सुनिल भंडारे, हर्षदिप सोनपसारे, गौतम मोरे, गजानन देशमुख,गौतम जाधव, विजय खंडारे, एस.डी. कुळकर्णी,भाऊसाहेब देशमुख,शाम कऱ्हाले,प्रमोद पवार,गजानन सरदार, केशव बोर्डे, एच.व्ही. खिल्लारे,राहुल जाधव यावेळी जिल्हाभरातील एसटी कास्ट्राईबचे पदाधिकारी, सभासद बहुसंखेने उपस्थीत होते.