मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे संपन्न होणार बहुजन साहित्य संघाचे साहित्य संमेलन २०२५.

सिंदखेड राजा/ प्रतिनिधी  दि. 3 फेब्रुवारी : आज ब.सा.संघाच्या वतीने सिंदखेड राजा येथे एक तातडीची छोटेखानी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये बहुजन साहित्य संघाच्या ३१ मार्च, २०२५ रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे नियोजित असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या सोहळ्यासाठी सुंदर, आकर्षक व योग्य असे ठिकाण ठरवण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. एवढेच नाही तर त्या निमित्ताने सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे ब. सा. संघाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी संघाचे पदाधिकारी व दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांच्यासह भेट देऊन स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयाचे मालक संचालक मा. शिवप्रसाद ठाकरे यांच्याशी चर्चा करून मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरी खऱ्या अर्थाने विकासापासून वंचित असल्या कारणाने महाराष्ट्रातील सूज्ञ साहित्यिकांच्या व विचारवंतांच्या नजरेस ही वस्तुस्थितीआणून देणे व शासनाचे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे यासाठी होत असलेल्या ब. सा. संघाच्या प्रस्तावित साहित्य संमेलनाची रूपरेषा व उद्दिष्ट त्यांच्यासमोर विषद केली. व दि. ३१ मार्च, २०२५ रोजी मातोश्री मंगल कार्यालय सदर संमेलन सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आणि त्यांनी सुद्धा अत्यंत मोठ्या मनाने त्या विनंतीचा मान ठेवून, अशा ऐतिहासिक व अविस्मरणीय तथा वैशिष्ठ्यपूर्ण संमेलनासाठी मातोश्रीचा हातभार लागण्याची संधी मिळाली, असे आनंदाने जाहीर करून या साहित्यजत्रेसाठी आपला सहर्ष सहभाग नोंदवला. याबद्दल त्यांचे हार्दिक आभारासह, बहुजन साहित्य संघाच्या वतीने डॉ. कस्तुरे तसेच ज्ञानेश्वर बुधवत यांनी, अभिनंदन करून त्यांना मनापासून धन्यवाद दिले. या बैठकीस भावकवी अंकुश पडघान व इतर मान्यवर उपस्थित होते.

बहुजन साहित्य संघाच्या दि. ३१ मार्च, २०२५ च्या नियोजित, मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरी येथे संपन्न होऊ घातलेल्या राज्यस्तरीय सहाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विचारात असलेले मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचे प्रस्तावित मुद्दे पुढीलप्रमाणे…..

 

१) बहुजन साहित्य संघाचे साहीत्य संमेलन २०२५ मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न व्हावे.

 

२) या साहित्य संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील मान्यवर साहित्यिक मंडळी, लेखक, कवी इत्यादींचा समावेश असावा.

 

३) या संमेलनासाठी परीसरातील नागरीकांसोबतच स्थानिक शासन प्रशासनाचा सुद्धा सहभाग असावा.

 

४) संमेलनाच्या पूर्वतयारी व संपन्नतेसाठी साहित्यिक व कार्यकत्यांची संमिती किंवा मंडळ असावे.

 

५) या संमेलना मध्ये वृत्तपत्रिय व वृत्तवाहीनी क्षेत्रामधील संपादक, पत्रकार, इत्यादी सर्व मान्यवरांचा सहभाग असावा.

 

६) या संमेलनासाठी सामिजिक, शैक्षणिक, सांकृतिक, क्रिडा तसेच राज‌किय क्षेत्रातील मान्यवरांचे निस्पृह सहकार्य असावे.

 

७) या संमेलनाच्या निमित्ताने प्रस्तापितांच्या बरोबरच नवोदित लेखक, कवी, व साहित्यिकांना संधी मिळावी.

 

८) संमेलनातून मातुतीर्थ जिल्हाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी / परीसवांद व्हावा.

 

९) नागरीकांच्या मान‌वाधिकारांची तसेच संविधानाद्वारे मिळालेल्या मुलभूत अधिकार व कर्तव्ये यांची ओळख नागरीकांमध्ये निर्माण व्हावी.

 

१०) संमेलनासाठी केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली यांचा सहभाग असावा.

 

११) मातृतीर्थ सिंद‌खेड राजा नगरी येथे राष्ट्रमाता जिजाऊ महिला विद्यापीठ असावे, यासाठी शासनाला साकडे घालावे.

 

१२) मातृतीर्थ जिल्ह्यातील विश्व विख्यात लोणार सरोवराच्या विकासामध्ये सरोवराच्या डोंगरकड्यांवरून पुर्व पश्चिम रोप वे साठी ( भूवैज्ञानिक

विचारांतर्गत अध्ययनानुसार ) प्रस्ताव

शासनासमोर मांडावा.

 

१३) मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये विमानतळ असावे. जगप्रसिद्ध लोणार तसेच शेजारीच अजिंठा लेणी असल्यामुळे जिल्ह्यात ही सुविधा असण्यासाठी प्रस्ताव मांडावा.

 

१४) जिल्ह्यातील बुलढाणा शहरास टेकूनंच असलेल्या राजूर घाटातील प्रचंड डोंगरकडे विचारात घेता तेथे सुद्धा रोप वे बनवून पर्यटनाची व्यवस्था व्हावी.

 

१५) बुलढाणा शहराला जड वाहनांच्या वाहतूकीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने चिखली रोड वरील साखळी फाट्यापासून, पश्चिमे कडून शहराला वळसा घालणारा वळण मार्ग (बायपास), घाटामधुन घाट रस्ता बनवावा लागला तरी, बनवण्यात यावा.

 

१६) सर्व सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना व महीलांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेणाऱ्या योजना शासनाने त्वरेने राबवाव्यात.

 

१७) मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह असावे.

 

१८) संत चोखामेळा यांचे गाव, उपेक्षित मेहूणा राजाचा तीर्थक्षेत्र या नात्याने त्वरेने सर्वांगीण विकास होईल यावर भर देण्यात यावा.

 

१९) सिंदखेड राजा परिसरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे जतन व सौंदर्यीकरण करण्याला विशेष प्राधान्य देण्यात यावे.

 

२०) मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये भव्य ग्रंथदालन व अध्यासन केंद्र असावे.

 

२१) मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरामधून गेलेल्या नागपूर – पुणे महामार्गावरील जड व जलदगती वाहनांची वर्दळ लक्षात घेता शहराला वळण मार्ग असावा…..

 

२२) फुले आंबेडकरी विचाराचा व संविधानिक सामाजिक समरसतेचा प्रचार व प्रसार व्हावा…

 

इ. महत्त्वाचे विषय या संमेलनाच्या माध्यमातून विचारात घेऊन शासन प्रशासनाने त्यावर त्वरेने लक्ष केंद्रित करण्यासाठी विचार विनिमय करण्यावर

भर कसा देता येईल यास्तव संमेलन मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *