चिखली / प्रतिनिधी कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा तसेच यशवंतराव पाटील कनिष्ठ कला महाविद्यालय शिवणी आरमाळ येथे रमाई जयंती तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला माता रमाई आणि सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी माता रमाई यांचे गाणी गायली आणि त्यांच्या जीवनावर भाषणे केली. अस्मिता घेवंदे सुहानी सोनपसारे. लक्ष्मी सोनपसारे. शिवानी इंगळे प्रतिक्षा जाधव. प्रशांत घेवदे.विवेक. संदीप यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुख्याध्यापक एन के पडघान. डी पी आरमाळ. सिद्धार्थ काळे संतोष तेजनकर सर यांनी भाषण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल आरमाळ होते तर सूत्र संचालन शिक्षक सदानंद मोरे यांनी केले आभार सुरेश जायभाये यांनी मानले मंचावर मुख्याध्यापिका तिडके मॅडम मधुकर आरमाळ होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र चेके.आर ए नागरे. बी आर पवार.गजानन खरात मोहन घोंगे राजू तेजनकर अमोल शिंदे विनोद आरमाळ एम बी झळके शांताबाई शिंगणे शालू झिने यांनी प्रयत्न केले शेवटी सर्वांनी स्नेह भोजन केले.
