मेहकर/ प्रतिनिधी येथून जवळच असलेले पेनटाकळी ता.मेहकर येथील ग्रामस्थ गेल्या ३५ वर्षांपासून पेनटाकळी नवीन गावठाण पुनर्वसना पासुन वंचित आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे ही मागणी घेऊन येथिल गावकरी दि.६ फेब्रुवारी पासून पेनटाकळी धरणात उपोषण करत असून आमदार सिद्धार्थ खरात यांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन गावकरी मंडळी सोबत चर्चा करून त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली होती.आज दि.१३ फेब्रुवारी रोजी उपोषणाच्या आठव्या दिवशी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करून गावकऱ्यान समोरच हा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावणार असल्याची माहिती दिली. तर तेथून डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीस आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंधर बुधवत, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर,अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, उपविभागीय अभियंता शरद नागोरे, नगर रचनाकार सतिश वेरुळकर, पेनटाकळी चे सचिव जे पी मवाळ, सरपंच पी एस वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेनटाकळी प्रकल्पाचे काम २००२ साली पूर्ण झाले. परंतु प्रकल्पाच्या भिंतीजवळील पेनटाकळी ग्रामस्थांचे पुनर्वसनासाठी पूर्वी नगर रचनाकार विभागाच्या नियमानुसार २४९ प्लॉट्स चा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात ३८० प्लॉटची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन
संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी, रचनाकार विभागातील व कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प व देऊळगाव राजा, उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उपलब्ध जागेत २४९ ऐवजी रस्ते आणि मोकळी जागा कमी करून ३८१ प्लॉट असा आराखडा तयार केला हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर बुधवत, जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ वडतकर,मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ वडतकर, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष ॲड आकाश घोडे,संदीप गारोळे, योगेश कंकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.