सिंदखेड राजा /रामदासकहाळे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सन २०२३ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी येथील रमेश संताराम वाघमारे यांची कन्या स्नेहल हीची आयकर सहाय्यक,(मंत्रालय)पदी निवड झाली असल्याने स्नेहल च्या माहेरी वाघमारे आणि सासर च्या ससाणे परिवारात आनंद व्यक्त होत असून स्न्हेल ने सासर आणि माहेर च्या दोन्ही परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न केला तर यश दूर नाही स्नेहल विनोद ससाणे/ वाघमारे हीने लग्न केल्यानंतर यश मिळविले हे विशेष स्नेहल
ची आजी 1960 च्या दशकात म्हणजे जिल्हा परिषद स्थापने नंतर
कालकथीत आदरणीय इंदुमती संताराम वाघमारे मुख्याध्यापिका..
दुसरी पिढी स्नेहल चे मोठे बाबा
कालकथीत राजेंद्र संताराम वाघमारे मुख्याध्यापक..
आणि तिस-या टप्प्यात आता स्नेहल अधिकारी झाली त्याच बरोबर शरद वाघमारे आरोग्य सेवक
आई श्रीमती सुशीला रमेश वाघमारे अंगणवाडी शिक्षिका..
वहीनी शिला वाघमारे अधिपरिचारीका असा हा वाघमारे परिवार आहे सुशिक्षित आहे
थेट स्वतःला सिद्ध करत.. लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन जे यश मिळवलं ते अक्षरशः अभिमानास्पद बाब आहे..