बुलढाणा/रामदास कहाळे पत्रकारीता क्षेत्रात दिर्घ काळ सेवा करून समाजहितार्थ ज्यांनी लेखणी झिजवून आयुष्य समर्पीत करणाऱ्या पत्रकार तथा वृत्तपत्रविक्रेत्यांना मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून ” पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार “ चा कार्यक्रम 16 फेब्रुवारी 2025 रविवारला बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात इतीहासातील पहीला कार्यक्रम मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत आणि संपूर्ण मराठी पत्रकार संघ कार्यकारणीच्या संकल्पनेतून हा साठ वर्षावरील जेष्ठ पत्रकाराचा सन्मान व्हावा व तोही जिने पत्रकारीता करण्याला साथ दिली त्या पुर्णींगीनीचा सत्कार केल्या जावा तीची पण दखल घेण्यात यावी व त्या उभयतांचा सन्मान व्हावा हा उद्देश समोर ठेवून बुलडाणा जिल्ह्यातील ६० वर्षवयावरिल जिल्ह्यातील आयुष्यभर समाजासाठी लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून जनतेला न्याय देण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी उनपाऊसवारा जिवाची पर्वा न करता समाजासाच्या हीतासाठी लेखणी झिजवली अशा ८७ जेष्ठपत्रकारांचा सहपत्निक मान्यवरांच्या उपस्थीतीत दैनिक वृत्तरत्न सम्राट, दैनिक सामपत्रचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव यांना “ पत्रयोगी जीवन गौरव “ पुरस्कार देऊन सत्कार केला व सहचारणी विमल बाबासाहेब जाधव यांना भेटवस्तू,साडी देऊन सन्मानित करण्यात आले. मिळालेला पुरस्कार उभयतांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर याना समर्पित केला.
सदर पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे हे होते प्रमुख उपस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव,महाराष्ट्राचे कॅबीनेट कामगार मंत्री खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर, बुलडाणा मतदार संघाचे आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड, आमरावती प्रादेशिक पदविधर मतदार संघाचे विधानपरिषदेचे आमदार धिरजदादा लींगाडे, मेहकर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थजी खरात, जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे,मातृतिर्थ सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोजदादा कायंदे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र विद्याधरजी महाले, बुलढाणा अर्बनचे सर्वासर्वे संस्थापक अध्यक्ष भाई राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, बुलडाणा जिल्हा शल्यचिकीत्सक डॅा. भागवत भुसारी, सुप्रसिध्द न्यूज विश्लेषक अँकर मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचे भुमिपूत्र पत्रकार प्रसन्न जोशी,बुलडाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, डिजेटीयल मिडीयाचे अनिल वाघमारे, अदिती अर्बनचे सरव्यवस्थापक सुरेंद्र जाधव, बुलडाणा नगरपालिकेचे मुख्यधीकारी गणेशजी पांडे, सह मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दैनिक विश्वविजेताचे संपादक चंद्रकांतजी बर्दे, दैनिक देशोन्नतीचे जिल्हाप्रतिनिधी तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बुलडाणा पत्रकार राजेंद्रजी काळे, मराठी जिल्हा पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष तथा गुडईव्हनिंगचे संपादक रणजितसिंगजी राजपूत, मराठी जिल्हा पत्रकार महीलासंघाच्या जिल्हध्यक्षा पत्रकार मृणालताई सोमनाथ सावळे, पत्रकार राजेश डिडोळकर, युवराज वाघ, ब्रम्हानंद जाधव, पत्रकार दिपक मोरे, जितेंद्र कायस्थ, गणेश निकम, रविंद्र गणेशे,संतोष लोखंडे, विजय देशमुख, पंजाबराव ठाकरे,डॅा. संजय महाजन, विश्वास पाटील, वसीम शेख अनवर, कासीम शेख, डॅा. अनिल मापारी, गजानन राऊत, समाधान चिंचोले, शिवाजी मामनकर मराठी पत्रकार संघाचे बुलडाणा तालुखाध्यक्ष राम हिंगे, बातमी जगतचे मुख्यसंपादक कैलास राऊत यांच्यासह आदी असंख्य पत्रकार उपस्थीत होते. या नभूतो न भविष्यती ऐतिहासीक कार्यक्रमाची मान्यवरांनी प्रशांसा केली व जिल्हाभरात व मिडीयामध्ये रणजीतसिंग राजपूत व त्यांचे टीमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील पत्रकार व पत्रकारांवर प्रेम करणारे बहुसंख्येने उपस्थितीत होते. या एतिहासीक कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार प्रशांत देशमुख, बहारदार सुत्रसंचलन रणजितसिॅग राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिषेक वरपे यांनी केले.