खामगाव,(प्रतिनिधी)- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाचे राष्ट्रीयध्यक्ष दिनदुबळ्याचे ह्रदय सम्राट केंद्रीय सामाजिकन्याय मंत्री भारत सरकार हे रात्रंदिवस पायाला भिंगरी सारखे फिरून डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेवून संपूर्ण भारतभर, देशाबाहेरही रिपाईचा विचार सांगत आहे व रिपाई पक्ष वाढवीत आहे त्या नेत्याची ७ एप्रिल २०२५ ला मलकापूर नगरीत जाहीर सभा आयोजीत केली आहे. जाहीर सभेच्या नियोजनासाठी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी खामगाव शासकीय विश्रांती गृहात बैठक संपन्न झाली.
सर्वप्रथम फुले,शाहू, डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व स्मृतींना वंदन करून बैठकीची सुरवात करण्यात आली. सर्व उपस्थीतांचा पदाधिकाऱ्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या महत्वपूर्ण बैठकीच्या आध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उत्तरचे (घाटाखाली) भाऊसाहेब सरदार होते. या बैठकीचे नियोजन जिल्हामहामंत्री पॅंथर भाई निळकंठदादा सोनोने यांनी यांनी केले होते. या बैठकीत रिपाई आठवलेचे स्वाभामानी जिल्हाध्यक्ष दक्षिणचे (घाटावरिल) इंजिनियर शरद खरात, जिल्हासंपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे सर्वश्री तालुकाध्यक्ष संग्रामपूर बाबुलालजी इंगळे,जळगांव जामोद संतोष वानखडे, नांदुरा शैलेश वाकोडे, मलकापूर दिलीप इंगळे, जिल्हाउपाध्यक्ष भगवानराव इंगळे, अल्पसंख्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा, विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, जिल्हाध्यक्ष बुलडाणा जिल्हा उत्तर रोहीणीताई कबीरदास, दक्षिणचे युवाध्यक्ष विजय साबळे, उत्तरचे युवाध्यक्ष मंगेश मेढे यांनी ७ एप्रील रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जाहीर सभा आयोजीत केली आहे ती कसी भव्यदिव्य होईल यावर सविस्तर मार्गदशन केले व रिपाईच्या पूढील वाटचालीवर वरिल मान्यवरांनी मार्गदशन केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार म्हणाले की, मलकापूर येथील जाहीर सभेसाठी सर्व तालुकाध्यक्ष, ग्रामीण,शहरी, महीला आघाडी, युवा आघाडी यांनी होणाऱ्या जाहीर सभेसाठी तनमनधनाने मदत करून ही जी मलकापूर शहरामध्ये होणारी एतीहासीक सभा कसी न भुतो न भविष्यती होईल व ही सभा संपूर्ण महाराष्ट्रात गाजली पाहीजे त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सभासदानी गावपातळीवर खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यात जाऊन डॅा. रामदासजी आठवले व रिपाईची होणारी वाटचाल व आठवले साहेबांचे विचार रिपाईचे ध्येय धोरण लोकांनपर्यंत पोहोचवून या जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त संखेने कार्यकर्ते उपस्थीत राहण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान उपस्थीतांना केले.
या बैठकीत रिपाईच्या पूढील ध्येयधोरणावर विचार विनिमय करून पूढील होऊ घातलेल्या स्वराज्यसंस्था, जिल्हपरिषदा, नगरपालीका निवडणूकी बद्दल आपल्या पक्षाची राजनिती ठरली. तसेच “ रिपाईची गाव तीथे शाखा व घर तीथे कार्यकर्ता “ आभीयान व ३० डिसेंबर २०२४ पासून सूरू आहे ते आभियान जास्तीत जास्त रिपाईच्या शाखा करून रिपाईची ताकद कसी वाढेल व राजकीय क्षेत्रात, सामाजीक क्षेत्रात, शासन प्रशासनात रिपाई आठवलेंचा दबदबा कसा वाढेल यासाठी शाखा करून संघटन करा व रिपाईची ताकद वाढवा.
नविन पदाधिकाऱ्यांना या बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले. नविन कार्यकत्यांना प्रवेश देऊन त्यांचे स्वागत करण्यात केले.
यावेळी जिल्हाभरातील मनोज धमेरिया खामगाव तालुखाध्यक्ष, चिखली हिम्मतराव जाधव, बुलडाणा केशव सरकटे,लोणार समाधान सरदार, सिंदखेडराजा रमेश पिंपळे, विजय भालमोडे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल , विश्वनाथ वानखडे जिल्हाउपाध्यक्ष, विलास गव्हांदे जिल्हा सचिव, शोभाताई आगलावे महीला खामगाव शहरध्यक्ष, भास्कर शेगोकार,ढगे साहेब, सुशिल उगले, विश्वनाथ वानखडे या बैठकीचे प्रस्तावीक संतोषदादा वानखडे तर बहारदार सुत्रसंचलन पॅंथर निळकंठ सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन शेगाव तालुखाध्यक्ष सुरज शेगोकार यांनी केले.
या बैठकीस जिल्हाभरातील असंख्य पदाधीकारी, सभासद व रामदासजी आठवले यांचेवर प्रेम करणारे उपस्थीत होते.
राष्ट्रगिताने बैठकीची सांगता झाली.