https://vruttamasternews.com/buldhana-news-259-2/
बुलढाणा जिल्ह्याचे भुमीपत्र प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी ; प्रतापराव जाधवांच्या रुपात बुलढाणा जिल्ह्यातील भुमीपुत्राला प्रथमच मिळाली केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी
सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा आमदार, राज्यांत राज्यमंत्री , चारवेळा खासदार व आता केंद्रीय मंत्री असा राहीला प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास
बुलढाणा : सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम करणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्य मंत्रीपदी (स्वतंत्र कारभार)वर्णी लागली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून सुरू झाली सरपंच ते , जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, तीनवेळा आमदार, राज्यांत राज्यमंत्री पुढे चारवेळा खासदार व आता केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची मजल असा त्यांचा आजवरच राजकीय प्रवास राहिला आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार तथा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण तसेच पाटबंधारे राज्यमंत्री (लाभ व विकास) म्हणून त्यांनी काम केले होते.
प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मादणी / अंजनी बुद्रुक या गावात झाला. त्यांचे मेहकर येथे बारावीपर्यंत मेहकर झाले .शिक्षण पूर्ण त्यानंतर चिखलीतील शिवाजी काॅलेजमध्ये बीएपर्यंतचे शिक्षण झाले. 1 एप्रिल 1983 रोजी मध्ये त्यांचा विवाह राजश्री यांच्या सोबत झाला. त्यांना ऋषी जाधव नावाचा मुलगा व एक मुलगी आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. तर मेहकर बाजार समितीमध्ये ते आडत व्यापारी म्हणून काम करत असत. त्यावेळी त्यांनी बाजार समितीमधील पॅनल उभे करून त्या ठिकाणी देखील सत्ता ताब्यात घेतली.
त्यावेळचे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते दिलीपराव रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेनेचे काम सुरू ठेवले. त्यांनी मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला दबदबा वाढवत नेला. त्यामुळे 1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला होता.
विदर्भातील शिवसेनेचे प्रमुख नेते
सलग चौथ्या टर्ममध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 2009, 2014 आणि 2019 आणि 2024 अशा सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी झालेले आहेत. त्यामुळे विदर्भातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये प्रतापराव जाधव यांचा समावेश होतो.
दोन महत्त्वपूर्ण समित्यांवरही कार्य
गेल्या पंचवार्षिकमध्ये केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तसेच त्यानंतर केंद्रीय माहिती व संवाद तथा तंत्रज्ञान समितीचेही अध्यक्षपद भुषवत त्यांनी ग्रामविकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुचनाही या दोन्ही समित्यांच्या माध्यमातून केल्या होत्या. त्याचा या दोन्ही क्षेत्रातील धोरण ठरवितांना लाभ झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्याला केंद्रात तिसऱ्यांदा बहुमान मात्र प्रतापराव जाधव यांच्या रुपात बुलढाणा जिल्ह्याच्या भुमी पुत्राला प्रथमच मिळाला केंद्रीय मंत्रीपदाचा मान
बुलढाणा जिल्ह्याला खा. प्रतापराव जाधव यांच्या रुपाने तिसऱ्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळाले आहे मात्र प्रतापराव जाधव यांच्या रुपात बुलढाणा जिल्ह्याच्या भुमी पुत्राला प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाचा लाभ मिळाला आहे. यापूर्वी मुळचे नागपूर येथील असलेले मात्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक आलेले मुकूल वासनिक हे पहिल्यांदा 1990 च्या दशकात केंद्रामध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री बनले होते. त्यानंतर मुळचे मुंबईचे असलेले परंतु बुलढाणा लोकसभा मतदारसंघातुन निवडून आलेले 2002 मध्ये केंद्रातील एनडीएच्या सरकारमध्ये एकसंघ शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री बनले होते. त्यानंतर आता प्रतापराव जाधवांच्या रुपाने जिल्ह्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. मात्र प्रतापराव जाधव यांच्या रुपात बुलढाणा जिल्ह्याच्या भुमीपुत्राला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)पदाचा लाभ मिळाला आहे.
प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास एका दृष्टीक्षेपात
1995 ते 2009 – आमदार , मेहकर विधानसभा
1997 ते 1999 – क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.
2009 – बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून निवड.
2009 ते 2024 सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.
2009 ते 2024 – अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघातून 29, 376 मतांनी विजय मिळवला होता. मतमोजणी दरम्यान अखेरच्या 25 व्या फेरीमध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांना 3, 48, 238 मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना 3,18, 862 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना 2,48, 977 इतके मते मिळाली होती .या तिरंगी लढतीत प्रतापराव जाधव यांचा 29376 मतांनी विजय झाला होता. पण प्रतापराव जाधव यांना यंदाच्या लढाईत चुरशीची लढत द्यावी लागली होती, ही लोकसभा निवडणुक अतिशय अटीतटीची झाली होती हे मात्र तितकेच खरे आहे.
प्रतापराव जाधव यांचे संघटनात्मक कार्य
1986 मध्ये मेहकर तालुक्यामध्ये शिवसेनेची स्थापना
1986 ते 1988 मध्ये तालुका संघटक
1988 ते 1990 मध्ये तालुका प्रमुख
1990 पासून बुलडाणा जिल्हा शिवसेना प्रमुख
जिल्हयामध्ये 100 शाखा स्थापनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग
2014 ते 2021 शिवसेना संपर्कप्रमुख
2021 ते आजतयागत शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य
80 टक्के ग्रामपंचायत
शिवसेना यश संपादन केलेल्या सहकारी व सहकारी संस्था
80 टक्के ग्रामसेवक सह. संस्था
9 पैकी 8 विविध कार्यकारी संस्था 2 पैकी 2 सह जिनौग सह फैक्ट्री.
मेहकर तालुका खरेदी-विक्री संघ मेहकर
संस्थापक अध्यक्ष-महाराष्ट्र अर्बन को. ऑप. सोसा. मर्या.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती
मेहकर नगरपालीका
मेहकर पंचायत समिती
लोणार नगरपालिका
लोणार पंचायत समिती
– लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती
1- महाराष्ट्र नागरी सहकारी सह. पत संस्था, मेहकर
जय भवानी नागरी सह. पत संस्था लोणार.
राजकीय वाटचाल
१९८८ ते १९९२ – मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष
१९९२ – 1- जिल्हा परीषद सदस्य
१९९३ – मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती.
१९९० – 1- मेहकर विधानसभा मतदार संघात पराभूत
१९९५ मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार
१९९७ ते १९९८ – क्रिडा, पाटबंधारे, राज्यमंत्री अकोला जिल्हयाचे पालकमंत्री.
दुस-यांदा आमदार २००४ – तिसऱ्यांदा आमदार
2009 – पहिल्यांदा बुलडाणा लोकसभा मतदार संघातून विजयी
2014 दुसऱ्यांदा बुलडाणा लोकसभा मतदार संघातून विजयी
2019 तिसऱ्यांदा बुलडाणा लोकसभा मतदार संघातून विजयो
२०१९ ते २०२२ – अध्यक्ष ग्रामविकास व पंचायतराज समिती
२०२३ – अध्यक्ष संवाद व माहिती तंत्रज्ञान समिती भारत सरकार,
सदस्य-हिंदी राजभाषा समिती सदस्य-परामर्शदात्री समिती श्रम एवं रोजगार मंत्रालय
सदस्य-सामान्य प्रयोजन संवधी समिती, लोकसभा
1- मविम (महिला आर्थिक विकास महामंडळ), उमेद (राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान), NULM (राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान) यांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले व आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची राज्यमंत्रीपदी (स्वतंत्र कारभार ) वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव आपल्या या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा उपयोग करून बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करतील व प्रतापराव जाधव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाने बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच चालना मिळेल असे दिसते आहे