२मार्च रोजी मलकापूर येथे बौद्ध धम्मीय युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन!

मलकापूर /उल्हास शेगोकर प्रबुद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा २ मार्च रोजी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे बौद्ध धम्मिय उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अशांतजी वानखेडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ, उद्घाटक राहुलजी तायडे तहसीलदार मलकापूर विशेष निमंत्रितअतिथी म्हणून आमदार चैनसुखजी संचेती मलकापूर, संतोषजी शिंदे उपविभागीय अधिकारी मलकापूर, आनंदराव वानखडे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था तसेच प्रमुख अतिथी सी.झेड.ससाने केसीएस पेट्रोलियम खामगाव, डॉ. सिद्धार्थ मेश्राम माजी प्राचार्य नांदुरा, प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण जनता कॉलेज मलकापूर, अमोलभाऊ शिरसाट संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर, संजय भालेराव राज्याध्यक्ष प्रबुद्ध संस्था, साहेबराव जवरे संचालक नांदुरा अर्बन बँक नांदुरा , ऍड. माणिकराव पवार, सौ छायाताई बांगर महिला जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा, प्रमोददादा अवसरमोल जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय काँग्रेस, एस.एस.वले जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा, प्राचार्य पी.डी. इंगळे डी. ई.एस ज्यु. कॉलेज दाताळा, भाऊसाहेब सरदार जिल्हाध्यक्ष रिपाई (आ.) म्हणून उपस्थित राहणार असून उपवर युवक- युवती सह पालकांनी हजर राहण्याचे अवाहन आयोजक/ निमंत्रक उल्हास शेगोकार (पत्रकार )विदर्भ कार्याध्यक्ष प्रबुद्ध सामाजिक संस्था यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *