चिखली/ सदानंद मोरे कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा शिवणी आरमाळ येथे राष्ट्रीय सायन्स दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सी वी रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एन के पडघान यांनी हार घालून केले. त्यानंतर शिक्षक सदानंद मोरे यांनी सी वी रामन यांच्या जीवन कार्या विषयी माहिती देताना सांगितले की प्रकाश किरणांच्या विकेंद्रीकरण शोध दिवस म्हणून राष्ट्रीय सायन्स दिवस देशभर साजरा करण्यात येत असतो. आपण श्रद्धा ठेवली पाहिजे पण अंधश्रद्धा नको. प्रश्न विचारला शिकलं पाहिजे. प्रश्न पडले पाहिजे. तर्क केला पाहिजे. शिक्षक सुरेश जायभाये मुख्याध्यापक एन के पडघान यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन आर ए नागरे यांनी केले. याप्रसंगी प्रा आरमाळ. पत्रकार वैजनाथ खंदारे. राजू तेजनकर. अविनाश राठोड शांताबाई शिंगणे शालू झिने उपस्थित होते.
