’https://vruttamasternews.com/buldhana-news-272-2/
उपमुख्यमंत्री यांच्या खाजगी सचिवांनी घेतली
. नायब तहसीलदार वीर यांच्या कामाची दखल
————————————————
मेरा बु : – चिखली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वीर यांनी शेतकऱ्यांना शेत रस्त्याच्या प्रकरणात तारीख न देता तात्काळ शेतकऱ्यामध्ये समझोता करूण १५ दिवसात २५ शेत रस्ते मोकळे केले या कामाची माहिती उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांना मिळताच यांनी नायब तहसीलदार वीर यांनी शेतकऱ्यासाठी चांगले काम केल्यामुळे त्यांचा सत्कार करूण कौतुक केले .
ग्रामीण भागात आता खरिपाच्या पेरण्याला काही दिवसातच सुरवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये शेताच्या शेत रस्त्या बाबत एकमेका विरुध्द तहसील कार्यालयात तक्रारी दाखल झाल्या होत्या .आलेल्या तक्रारी वरुण नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशः आपल्या हक्काच्या शेतीत उत्पन्न सुद्धा घेणे सोडले होते, रस्ता हा शेतकऱ्यांसाठी अति आवश्यक असताना काही विकृत मानसिकता असलेले व्यक्ती अवैधरित्या जमिनीवर कब्जा करून तर काही सामाजिक भान न ठेवता अन्य शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यात हेतुपुरस्सर अडथडे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची गैरसोय होत असे तसेच शेतीशी संबंधित कामे योग्य प्रकारे पार पाडू शकत नव्हते त्यामुळे शेत रस्त्याच्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होऊन शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती असे होऊ नये म्हणून शेतीच्या पेरण्या सुरू होण्याआधी तहसील कार्यालयात प्रकरणाला तारीख न देता तात्काळ शेत रस्त्याच्या दोन्हीं बाजूचे शेतकरी , मंडळ अधिकारी , तलाठी , यांना सोबत घेवून शेत रस्ते खुले करून दिले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाचा, प्रगतीचा मार्ग मोकळा . त्यामुळे शेतकऱ्यांचा शेत रस्त्याचा महत्वाचा प्रश्न हा मार्गी लागला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी नायब तहसीलदार वीर यांचा सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप दिली तसेच त्यांचे बंधू सुभाष वीर यांनी सलग २४ वेळा रक्तदान केल्याने त्यांचे ही यावेळी कौतुक केले .