बिबी/ भागवत आटोळे लोणार तालुक्यातील बिबि व
परिसरातील शाळा सोडलेले व शाळेचे शिक्षण घेत असणारे ११ ते ३० वर्षे वयोगटातील युवकांकरीता महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र “क” प्राप्त श्री गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था बिबी ता.लोणार येथे कित्येक वर्षापासून अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे….
सदर युवकांना संस्था तर्फे बालसंस्कार शिबीर व वारकरी प्रशिक्षण देण्यात येणार आहे…
प्रशिक्षणामध्ये टाळ व मृदंग वाजवणे… ज्योतिषी शास्त्र हरीपाठ व अभंग म्हणणे देव देश धर्म व आपली संस्कृती या विषयावर प्रवचने इत्यादींचा समावेश आहे
निवास व भोजनाची व्यवस्था संस्थान मार्फत मोफत करण्यात येईल…
तरी भजन शिकण्याची इच्छा असणाऱ्या युवकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा कसे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे
*संपर्क – ७३५०२५०३८६*
*९०११७४९७८५*