बुलडाणा,(रामदास कहाळे)- बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हासंपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार उत्तर, जिल्हाध्यक्ष दक्षिण इंजिनियर शरद खरात, जिल्हाकार्ध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, महीलाध्यक्ष वंदनाताई वाघ, जिल्हा महासचिव पॅंथर निळकंठ दादा सोनोने, जिल्हायुवाध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के,जिल्हा अल्पसंख्य आघाडी दक्षिण जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, शेख वजीर उत्तर, महीलाध्यक्ष उत्तर रोहीणी कबीरदास, जिल्हाउपाध्यक्ष सर्वश्री भगवानराव इंगळे, दत्ता पाटील राहणे, भाऊसाहेब वानखडे, सुनिल इंगळे, जिल्हसचिव विलास गव्हांदे, बुलडाणा जिल्हासंघटक ग.ग.इंगळे, मेहकर विधानसभा प्रमुख डॅा. सुखदेव कांबळे, यांचे नेतृत्वाखाली महामहीम राष्ट्रपती, देशाचे विकासमृर्ती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॅा. रामदासजी आठवले यांना बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाकडून बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत १२ मार्च रोजी निवेदन देण्यात आले.
बिहार राज्यामधील बुध्द गया येथे भगवान गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि बुद्धत्व प्राप्त झाले. त्यामुळे हे स्थळ जागतिक बौद्ध धर्माचे पवित्र स्थान आहे.
या विहाराच्या व्यवस्थापनाचा अधिकार बौद्ध धर्मीयांना मिळायला हवा, इतर धर्मियांना जसा त्या त्या धर्मीक स्थळाचा त्याच धर्माच्या लोकांना आहे तसा बुध्दगया येथील बुध्दाच पवित्र स्थान हे बौध्द धर्मीयांच्या ताब्यात देऊन व्यवस्थापनचे व धार्मीक विधीचे निर्णयाचे आधिकार द्यावे.
सन 1949 च्या कायद्यातील तरतुदीनुसार तो अधिकार अद्याप मिळालेला नाही.
तो 1949 चा कायदा रद्द करावा व शासन दरबारी कायद्यात दुरूस्ती करून संपूर्ण अधिकार बौध्द धर्मीयांना व बुौध्द धर्मगुरूना द्यावेत असी तरतूद करावी हे असेच पूर्वी सारखे चालू राहीले तर त्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायांमध्ये असंतोष पसरला आहे.
हा १९४९ चा कायदा रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन आणि तेथील निर्णय घेण्यासाठी, तसेच बौद्ध धर्मातील परंपरा आणि संस्कृतीनुसार सर्व विधी होण्यासाठी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयध्यक्ष रामदासजी आठवले यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण भारत भर आंदोलन उभारले जाईल या आंदोलनाचे काही दुश प्ररिणाम झाले तर यास शासन प्रशासन जबाब्बदार राहील याची शासन प्रशासन यांनी नोंद घ्यावी असा इशारा रिपाई आठवले गटा कडून निवेदनाव्दारे देण्यात आला.
निवेदन देते वेळी, सर्वश्री तालुखाध्यक्ष जळगांव जामोद संतोषराव वानखडे, बुलडाणा केशव सरकटे, चिखली हिम्मतराव जाधव, देऊळगाव राजा प्रकाश मुखदयाल, शेगाव सुरज शेगावकर, मलकापूर दिलीप इंगळे, मोताळा बाळासाहेब आहिरे, सिंदखेड राजा रमेश पींपळे, मेहकर राणा मोरे, नांदुरा शैलेश वाकोडे, खामगाव मनोज धमेरिया, संग्रामपूर बाबूलाल इंगळे,बुलडाणा तालुखा महीलाध्यक्ष उषाताई इंगळे, रूपाली कांबळे, बुलडाणा तालुखाउपाध्यक्ष भास्करराव जाधव, अमर तायडे जळगांव जामोद सचिव, अमोल तायडे, सुर्यभान तायडे, महादेव तायडे, मेहकर शहरध्यक्ष मा. नगरसेवक शेख सलीम इत्यादी असंख्य बुलडाणा जिल्ह्यातील रिपाई पदाधिकारी सभासदाच्या सह्याचे वतीने निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.