सिंदखेड राजा /रामदास कहाळे आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी तहसीलदार यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांनसाठी महाडीबीटी कॅम्प राबवन्याबावत अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या विविध अडीअडचणीच्या बाबतीत निवेदन देण्यात आले, निवेदनात नमूद मागण्यांची पूर्तता दोन दिवसात करणार असल्याचे,अ भा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्या समक्ष तहसीलदार अजित दिवटे यांनीआश्वासन दिले.
सविस्तर वृत्त असे की,सिंदखेड राजा तहसील कार्यालयात निराधार योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड होत असल्याच्या बाबत अखिल भारतीय छावा संघटनेच्या निदर्शनास आल्यामुळे
पुढील उपाययोजना करण्याबाबत,वयोवृद्ध नागरिक यांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड होत असल्याने,संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या प्रकारच्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना सोयीचे होईल म्हणून सिंदखेड राजा तालुक्यात गावोगावी महाडीबीटी कॅम्प घेण्याबाबत, सदर योजनेतील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्याकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्या बाबत आणि तहसील कार्यालयात कामकाजासाठी 50 ते 60 किमी अंतरामुळे वयोवृद्ध नागरिक त्रस्त असतात त्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे, हा जो त्रास लाभार्थ्यांना याठिकाणी होत आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी,
जेणेकरुन संजयगांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील अपंग व वयोवृद्ध लाभार्थी अशिक्षित, वयोवृद्ध आणि अपंग असल्याने त्यांना अर्ज भरण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास या अभियानामुळे सहन करावा लागणार नाही, त्याचप्रमाणे अर्ज भरण्यासाठी, आधार मोबाईल क्रमांक लिंक पडताळणीसाठी तहसील कार्यालयात गर्दी होते ती होणार नाही, यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना सोईचे होईल यासाठी गावोगावी महाडीबीटी (अभियान) कॅम्प घेण्यात यावे. याचबरोबर या दोन्ही योजनेत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी वेळोवेळी पात्र लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी. वरील नमूद मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी त्याचप्रमाणे नागरिकांची हेळसांड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात यावी. वरील सर्व गंभीर बाबींवर अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन अशोक राजे जाधव यांनी तहसीलदार यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली,चर्चे दरम्यान अशोक राजे जाधव यांना नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल तातडीने दोन दिवसात अभियान राबवणार असल्याचे आश्वासन दिले त्या प्रसंगी उपस्थित कृष्णा कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा,बाळासाहेब शेळके विधानसभा अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना मातृतीर्थ सिंदखेड राजा,रफीक सैय्यद
प्रसिद्धीप्रमुख अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा,नारायण मस्के सोशल मीडिया प्रमुख अखिल भारतीय छावा संघटना देऊळगाव राजा,
माजी नगरसेवक नरहरी तायडे, निलेश देशमुख, अर्जुन एखंडे, गजानन राजे जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.