चिखली ( प्रताप मोरे ) : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत तहसीलदार संतोष काकडे यांनी नाविण्यपुर्ण उपक्रम राबवीत आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी महसूस ग्रंथालय सुरु केले.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, यांच्या शासन निर्णय नुसार सर्व क्षेत्रिय व निमशासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चीत केला आहे. सदर कृती आराखड्यातील मुद्दा क्रमांक 5 मध्ये कार्यालयीन सोयी-सुविधा अंतर्गत अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रततक्षालय व्यवस्था करण्याबात निर्देश आहेत. त्या अनुषंगाने 100 दिवसांमध्ये 7 कलमी मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या दृष्टीने चिखली तहसिल कार्यालयातील अभ्यागत प्रतिक्षालयात दिनांक 04.04.2025 रोजी तहसिलदार संतोष काकडे यांचे संकल्पनेतुन महसूली ग्रंथालयाचे उदघाटन चिखली विधानसभेच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचेहस्ते करण्यात आले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत चिखली तालुक्याच्या भौगोलिक दृष्टीने वं महसुल मंडळांच्या दृष्टीने तहसिल कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची कार्यालयीन कामकाजाकरीता येणाऱ्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कार्यालयात येतात आणि प्रशासकीय व्यस्ततेमुळे त्यांना कामासाठी कार्यालयात काहीवेळ प्रतिक्षा करावी लागते. अशावेळी नागरीकांचा कार्यालयातील वेळ सुलभपणे जावा व त्यांना कायद्याचे ज्ञान व्हावे या उद्देशाने या महसूली ग्रंथालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर ग्रंथालयात महसूल विषयक विविध कायद्यांवरील 75 पेक्षा जास्त पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. कार्यालयात कामकाजाकरीता येणाऱ्या नागरीकांनी व कर्मचाऱ्यांनी या मोफत महसूली ग्रंथालयाचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर पाडावी व लोकाभिमुख प्रशासनात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.
यावेळी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचेसह तालुक्यातील नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.