तथागत भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेली दानपारमीता बाबासाहेब जाधव व परिवारामध्ये पहावयास मिळते….!

बुलढाणा / रामदास कहाळे    महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी अनेक श्रद्धा संपन्न उपासक उपासिका कार्यरत आहेत.

त्यापैकीच ज्येष्ठ पत्रकार कास्ट्राईब एसटी महामंडळ संघटनेचे मा.राज्य उपाध्यक्ष तथा रिपाइं आठवलेचे जिल्हा संपर्क प्रमुख जेष्ठ पत्रकार बाबासाहेब जाधव त्यांच्या सुविद्य सहचारिनि सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विमलताई बाबासाहेब जाधव सुपुत्र डॉ. योगेश सुनबाई डॉ. श्रवंती अतिशय विनम्र भावनेने श्रद्धा संपन्न भावनेने सन १९८८ पासून दर वर्षी एक लाख रूपये दानपरामीतेच्या माध्यमातून आज पर्यंत आपलं भरीव योगदान देत आहेत.

संतश्रेष्ठ तुकोबा महाराज यांच्या प्रसिद्ध वचनानुसार ” जे का रंजले वगांजले त्याचे म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तिथेच जाणावा”

या वचनानुसार समाजातील उपेक्षित शोषित पीडित वंचित गरीब असह्य अशांना मदत करण्याचे काम ते करत असतात.

कोरोना कालखंडामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी केलेली मदत अजूनही प्रत्येकाच्या स्मरणात आहे.

लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये स्वतःचा जीव वाचवण्या साठी प्रत्येकाने स्वतःला बंदिस्त करून ठेवले होते.

परंतु बाबासाहेब जाधव वयाची पास्टावी (६५) उलटल्यानंतर घराघरांमध्ये गरीब असह्य लोक विधवा परितक्त्या यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू व धान्य घेऊन जात होते.

बुद्ध विहार ही आदर्श संस्कार केंद्र आहे समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष विहाराच्या माध्यमातून होऊ शकतो.

विहारामध्ये सुसज्ज अभ्यासिका वाचनालये सोई सुविधा असल्या पाहिजे.

त्यासाठी विहारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक दान देण्याचा काम ते करत असतात.

बाबासाहेब जाधव व विमलताई जाधव या दाम्पत्याने स्वतःच्या गरजा सिमीत केल्या आहेत.

आपल्या घरामध्ये १९८८ पासून कोणतेही प्रकारचे नोकर चाकर ठेवले नाहीत.

बाबासाहेब जाधव स्वतःची दाढी कटिंग स्वतःच करतात, पान सुपारी, चहापानी,

फोर व्हीलर स्वतः ड्रायव्हिंग करतात यावर

या मधून वाचणारा खर्च धम्मदान म्हणून ते देत असतात.

आपल्या पूज्य वडिलांचा त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरुजी यांचा आंबेडकरी व धम्म चळवळीचा वारसा ते नेटाने पुढे नेत आहे.

नागोराव जाधव गुरुजी यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन १९५६ च्या दशकामध्ये आपल्या शिक्षकी पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजसेवेला वाहून घेतले होते.

बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब रासु गवई, शांताबाई दाणी यांच्या सहवासात राहीलेले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमी आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समर्थ नेतृत्व त्यांनी केले.

त्यामधून बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो भूमिहीनांना जमिनी मिळाल्या.

सिंदखेडराजा या ठिकाणी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी वस्तीग्रह काढले.

सिंदखेडराजा पंचायत समितीचे ते पंधरा वर्षे सदस्य ,सिलींग जमीन वाटपाचे अध्यक्ष होते.

या कालखंडामध्ये त्यांनी शासनामार्फतच्या लोक कल्याणकारी योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवल्या.

वडिलांच्या विचाराचा वसा बाबासाहेब जाधव सातत्यपूर्ण चालवत आहेत.

नि गर्वी निर्मोही निर्विकार

असलेलं हे दाम्पत्य आपल्या आचारातून विचारातून समाजासमोर निरपेक्ष समाजसेवेचा आदर्श ते ठेवत आहे.

त्यांच्या कुशलकर्मास हार्दिक शुभेच्छा मंगल कामना….!

 

श्रीकांत रेशमाबाई देवराव हिवाळे सर पूर्णा जि.परभणी

9545082301

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *