धाड / प्रतिनिधी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 आयोजित डॉ.प्रविण शंकर बोर्डे (मा.श्रामणेर) यांच्या संकल्पनेतून महामानवास अभिवादन या परीक्षेमध्ये एकूण 101 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला,ज्यामध्ये तीन गट विभागले होते, वर्ग पहिली ते चौथी (पहिला गट),पाचवी ते दहावी (दुसरा गट) चौथी ते पोस्ट ग्रॅज्युएशन (सर्वसाधारण,खुलागट )
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र “माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तर ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल ” या मूलमंत्राला जागून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी तसेच स्पर्धा परीक्षेच्या विषयी मनात भीती न बाळगता यातून सामोरे कसे जायचे व विद्यार्थी वर्गांचा आत्मविश्वास कसा वाढेल याची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा महामानवाला अभिवादन परीक्षा म्हणून घेण्यात आली,
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मेणबत्ती, अगरबत्ती,धूप प्रज्वलित करून व पुतळ्याला हार घालून झाली डॉ.प्रवीण बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भातील सूचना देऊन शुभेच्छा दिल्या,स्थानिक अजिंठा बुद्ध विहार व परिसरात ही परीक्षा घेण्यात आली, तथागतांना व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचे अनावरण करण्यात आले व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले,या परीक्षेचे प्रमुख पाहुणे म्हणून,धाड नगरीचे सरपंच आयु.सौ.सावित्रीबाई सत्यवान बोर्डे,धाड नगरीच्या पोलीस पाटील आयु.नंदाताई प्रमोद बोर्डे,पशुधन विकास अधिकारी डॉ.नितीन देव्हाणे,डॉ.विजयजी जटे तर स्पर्धा परीक्षेची परीक्षक,पर्यवेक्षक व तपासणीक म्हणून आयु.श्याम चिंधाजी वाघ सर (जि.प.हायस्कूल धाड) आयु.संतोषराव जाधव,सर (मुख्याध्यापक) आयु.सौ.प्रणाली सुरडकर,मॅडम यांनी काम पाहिले,ही स्पर्धा परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली असे पर्यवेक्षक वाघ सर,जाधव सर व सुरडकर मॅडम यांनी सांगितले व परीक्षेचा निकाल व प्रोत्साहन पर बक्षीस हे 14 एप्रिल ला होईल,या स्पर्धा परीक्षेसाठी उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अल्पोउपहाराची व्यवस्था केल्या गेली,परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत डॉ.प्रवीण बोर्डे यांनी विचारले असता,खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या स्पर्धा परीक्षाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले असे विद्यार्थ्यांनी सांगितले व परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धा परीक्षेची चर्चा चालू आहे,या स्पर्धा परीक्षेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती 2025 व सर्व धम्म बांधव यांनी खूप मेहनत घेतली.