मेरा खुर्द उपकेंद्राच्या भोंगळ कारभारामुळे कोणड गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई
https://vruttamasternews.com/buldhana-news-3/
चिखली/ सिद्धार्थ पैठने
तालुक्यातील मौजे कोणड खुर्द येथे मेरा खुर्द उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो पण सद्यस्थितीत उन्हाचा पारा चाळीस ते 41 अंशवार पोहोचला आहे. तर एकीकडे गेल्या पाच सहा दिवसापासून शेतातील विद्युत वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने मौजे कोनड खुर्द गावाला पिण्याचे पाणी मिळत नसून उपकेंद्राचे अभियंता श्री पडघान यांना संबंधित विषयी संपर्क साधला असता कॉल रिसिव्ह करण्यास त्यांच्याकडे वेळ नाही तर सध्याचा उन्हाचा पारा चढत असून लहान मोठ्यासह जीवाची लाहीलाही होत आहे पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिनीचे ट्री कटिंग च्या नावाखाली दिवस दिवस वीजपुरवठा खंडित केल्या जातो मग वरिष्ठ अधिकारी कार्यालयात झोपा घेतात का असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे पिण्याच्या पाणी मिळत नसल्याने गावकरी त्रस्त आहेत मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर कोनड बुद्रुक धरण असल्याने विहिरीचे व जलवाहिनीचे काम जळजीवन मिशन पूर्ण झाले खरे आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला की आता आपल्याला भरपूर पाणी मिळणार परंतु नव्याचे चार दिवस होतात तर आता पाचव्या दिवशी पुन्हा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तोच पाणी प्रश्न एरणीवर आला आहे सध्या गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा परेशान आहेत याबाबत सरपंच यांना विचारणा केली असता मी जनरेटरची व्यवस्था करतो असे सरपंच अजबराव जावळे यांनी सांगितले तर सचिव डी आर डुकरे यांना पाणी प्रश्नावर बोलण्यास वेळ नाही मग गावच्या पाण्याचा प्रश्न महावितरणच्या भरवशावर सुटणार का असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.