https://vruttamasternews.com/buldhana-news-30/
अखेर रासप महिला जिल्हाधक्षा तारामतीताई जायभाये यांच्या तक्रारी ला यश.
देऊळगाव राजा / राजु भालेराव
लोणार तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येताच ह्या संस्थे च्या संचालिका तारामती जायभाये
, यांनी वारंवार लोणार, सिंदखेड राजा, बुलढाणा, अकोला, अमरावती, पुणे, मुंबई, मंत्रालय पर्यन्त शासकीय जागा वाचविन्या साठी धावपळ केली, परंतु कुठलीच कारवाई झाली नाही अखेर त्यानी लोणार तहसीलदार यांच्या कार्यालया समोर तीन दिवशीय उपोषण केल्यानंतर समिती नेमण्यात आली असून आणि कारवाई साठी गती मिळाली, त्यांनी सहकार संबंधित सर्व ऑफिस ला या शासकीय जागेत भ्रष्टाचार झाल्याचे अधिकारी यांना वारंवार कळवत राहिल्या, त्यातील काही राजकीय,शासकीय अडचणीला त्यांना सामना करावा लागला परंतु त्या हतबल झाल्या नाही,त्यांचवर उपोषण सुटल्यावर मैनेज झाल्याचे आरोप करण्यात आले, त्यांनी ते सहन केले, पण अखेर सत्य परेशान होत असतो, पराजित नाही. आणि आज संस्थे वर कारवाई करण्याचे अंतिम आदेश DDR ऑफिस नानासाहेब चव्हाण यांनी काढल्या नंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले यामध्ये पत्रकार बांधव,पोलीस अधिकारी वर्ग, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, addl कलेक्टर, कलेक्टर,सर्वांचे जायभाये यांनी आभार मानले.