समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! अपघाताची मालिका थांबता थांबेना .
दोन कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू!
सुनिल अंभोरे/जिल्हा प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जालना येथे शुक्रवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास दोन कारच्या धडकेत ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की काही मृतदेह हे रस्त्यावर पडलेले पहायला मिळाले. अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत दोन्ही गाड्यांना रस्त्यावरुन बाजूला करत, मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयात हलवले आहेत.काय आहेत अपघातग्रस्त गाडीचे तपशील?स्विफ्ट डिझायर आणि एर्टिका या दोन गाड्यांची धडक झाल्याची प्राथमिक माहिती कळत आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीचा क्रमांक (MH 12 MF 1856) असा आहे. एर्टिका गाडीचा क्रमांक (MH 47 BP 5478) असा आहे.
कसा घटला हा अपघात?
जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. स्विफ्ट गाडीने धडक दिल्यामुळे एर्टिका गाडी ही महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये असलेल्या चारही यवकाचा दुर्देवी मृत्यू
समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील कडवंची पेट्रोल पंपावर देऊळगावराजा तालुक्यातील स्विफ्ट डिझायर इंधन भरण्यासाठी गेली होती. इंधन भरल्यानंतर सदर अपघातात देऊळगाव राजा तालुक्यातील संदीप माणिकराव बुधवत विलास सुदाम कांयदे दोघे राहणार उंबरखेड प्रदीप मिसाळ पिंपळगाव बुद्रुक हे तिघे जागीच ठार झाले तर चौथा युवक उपचारादरम्यान मरण पावला सदर अपघातात ईरटीका कार मध्ये प्रवास करणारे मुंबईतील तीन जण जागीच ठार झाले समृद्धी महामार्गावर घडलेले हृदय द्रावक भीषण अपघातात नीयतीने तालुक्यातील चार युवकांना हिरावून घेतल्याने देऊळगाव राजा तालुक्यावर सुखकर्ता पसरली आहे सदर अपघातातील मृतक प्रतिद मिसाळ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्याला एक बहीण आहे तर कोरोना काळात वडीलाचे निधन झाले होते त्याच्या लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नाही तर विलास कायदे आणि अनिकेत चव्हाण हे दोघी अविवाहित आहेत मृतक युवकावर देऊळगाव राजा उंबरखेड पिंपळगाव बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अपघातातील मृतक संदीप विलास अनिकेत प्रदीप चौघे मित्र रात्री दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी निघाले होते औरंगाबाद येथे गाडी घेण्याच्या उद्देशाने समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी सिदखेडराजा इंटरनेटने ते निघाले होते कडवंची पेट्रोल पंप दिशेने असल्याने त्यांनी रॉंग साईड गाडी वळवली आणि घात झाला
पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी वर काढण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.