https://vruttamasternews.com/buldhana-news-332-2/
लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरील विष्णूलक्ष्मी मूर्ती जागीच ठेवण्याची शिवाजी राजेजाधव यांची मागणी
सिंदखेड राजा/
जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर गेल्या पंधरा दिवसापूर्वी उत्खननामध्ये महादेवाची पिंड सापडली आता गेल्या दोन दिवसापासून उत्खन होत आहे यामध्ये विष्णूलक्ष्मी मूर्ती सापडली या दोन्ही मूर्ती व पिंड जागीच ठेवण्यात याव्यात अशी मागणी शिवाजी राजेजाधव यांनी केले आहे
राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर महादेवाची पिंड व विष्णूलक्ष्मी ची मूर्ती उत्खननामध्ये सापडल्या या आहे तिथेच ठेवण्यात याव्यात किंवा शेजारी असलेल्या रामेश्वर मंदिरामध्ये ठेवण्यात याव्या तसेच काळाकोट किल्ल्यामधील वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात याव्यात इतरत्र हलवू नये सदर पिंड व मूर्ती लोणार येथे नेणार असल्याचे समजले त्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे शिवाजी राजेजाधव यांनी स्पष्ट केले महादेवाची पिंड व विष्णूलक्ष्मी मूर्ती सिंदखेडराजा येथेच ठेवण्यात यावे कारण सिंदखेडराजा शहराच्या दृष्टीने येथील पर्यटन वाढीसाठी व अध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या याचे महत्त्व वाढवण्यासाठी राजमाता जिजाऊ या नगरीचे वैभव यामुळे भर पडू शकते त्यामुळे शहर सोडून दुसरीकडे पिंड व मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी राजेजाधव यांनी दिला आहे