https://vruttamasternews.com/buldhana-news-34/
शहिद कैलास भारत पवार यांचे शहिद स्मारक उदघाट्नाच्या प्रतीक्षेत
चिखली/ राजू भालेराव
– अत्यन्त गरीबी व हालाकीच्या परिस्थितीत मोल मजुरी करून मुलांना घडवीत एक मुलगा देश सेवे साठी अर्पण करणारे ते वीर माता पिता आपल्या शहिद मुलाचे स्मारक कधी होईल वाट पाहुण आहेत मात्र सर्वच सत्ताधारी व विरोधी राजकीय लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी या शहिद स्मारकाकडे पाठ फिरविलेली दिसते.
भारत चीन ची सरहद सियाचिन येथे भारतीय सैन्यात कर्तव्यावर असतांना शहिद कैलास भारत पवार यांना वीर मरण आले. त्यांचा अंत्यविधी चिखली शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला यावेळी लाखो देशभक्तांनी त्यांना शेवटची आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी अनेक राजकीय सत्तारुढ नेत्यांनी विविध आश्वसणे दिली परंतु आज रोजी शहिद स्मारक उदघाट्न च्या प्रतीक्षेत आहे. लोकप्रतिनिधीनीं तात्काळ लक्ष देण गरजेचं आहे. या कामात हि राजकारण असल्याची चर्चा शहरात सुरु आहे संबंधित विभागाने स्मारकचे काम तात्काळ सुरु करून स्मारकचे उदघाट्न करावे अन्यथा सामान्य नागरिक वीर सैनिकांच्या स्मारक साठी रस्त्यावर उतरतील यात शंका नाही.