https://vruttamasternews.com/buldhana-news-364-2/
मोताळा तालुक्यात काँग्रेसला भगदाड
देऊळगाव राजा प्रतीनिधी राजु भालेराव
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश
आज दिनांक २५ जून २०२४ रोजी मोताळा तालुक्यातील कोल्हीगवळी येथील सरपंच श्री शिवाजीराव बोराडे पाटील यांचा तसेच उपसरपंच रवींद्र मुंडोकार , श्री विजय बोराडे, नंदू मापारी, नेताजी थिटे यांचा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पार पडला…!
यावेळी त्या ठिकाणी युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तथा युवासेना जिल्हाप्रमुख युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, मोताळा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख श्री ज्ञानेश्वर वाघ,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडवे, युवासेना सोशल मीडिया तालुका प्रमुख गणेश राजस यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!