Buldhana news भोंदु शिवा महाराजावर जादुटोणा विरोधी कायदया अतंर्गत गुन्हा दाखल करा 

https://vruttamasternews.com/buldhana-news-37/

भोंदु शिवा महाराजावर जादुटोणा विरोधी कायदया अतंर्गत गुन्हा दाखल करा

जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे मागणी

बुलडाणा ता .२ बुलडाणा तालुक्यातील शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज यावर महाराष्ट्र शासणाच्या जादुटोणाविरोधी कायदा अतंर्गत गुन्हा नोंदवा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्नध्दा निर्मलण समिती बुलडाणाच्या वतीने ता.२ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले . महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा .डॉ . संतोष आंबेकर , जिल्हाकार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे , कॉ .पंजाबराव गायकवाड आदींनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट घेवुन चर्चा केली . बुलडाणा जिल्हातील बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील शिवाजी पुंडलीक बरडे उर्फ शिवा महाराज याने एका महीलेला बेदम मारहाण करणाऱ्या विडीओ ने समाजमन सुन्न झाले आहे .

महाराजाचा या अगोदर चा विडीओ हा एका तरुणाला दारू सोडविण्यासाठी चा अघोरी उपचार आणि निष्ठुर मारहाण जिल्ह्यासह राज्यात गाजत असतानाच ता .३० रविवारी रोजी दुपारी महाराजांचा एक नवीन ‘व्हिडिओ’ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये भोंदू बाबा एका महिलेस निर्दयीपणे आणि तिचे केस गच्च धरून मारहाण करताना दिसत आहे. या चित्रफितमधील संभाषणावरून, महाराज त्या महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते. या अघोरी उपचाराला बळी पडणारी महिला कोण व कुठली आहे? याचा शोध घेवुन तात्काळ याप्रकरणी भोंदु महाराजावर महाराष्ट्र जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा . सदर कायदयात पोलीस अधिकाऱ्यांना फिर्याद नोंदविण्याचे महत्वाचा अधिकार दिला आहे त्यामुळे तात्काळ जिल्हापोलीस अधिक्षकांनी दखल घेवुन गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी .

सदर बाबावर दारू सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या तक्रारीवरून रायपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .

आपल्या जिल्हातील इतर याप्रकारे उपचार करणारे भोंदूबाबा महाराज , पादरी , मौलना अदी बाबांची माहीती घेवुन त्यांना सुद्धा जादुटोणा विरोधी कायदयाअंतर्गत नोटीस दयावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलण समिती चे प्रा.डॉ . संतोष आंबेकर जिल्हाकार्याध्यक्ष

प्रदीप हिवाळे,

कॉम्रेड पंजाबराव गायकवाड

अदीनीं केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *