https://vruttamasternews.com/buldhana-news-373-2/
ओबीसी उपोषणकर्ते प्रा.लक्ष्मण हाके यांचे युवकांना आवाहन
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करून अभिवादन यात्रेला झाली सुरुवात
सिंदखेडराजा:: ओबीसी घटकांचे आरक्षण वाचविण्यासाठी आता शाहू,फुले,आंबेडकर परत येणार नाहीत संविधनासह,आरक्षण वाचवायचे असल्यास ओबीसी तरुणांनी समाजकारण,राजकारणाच येथून सुरुवात केली आहे.पोहरादेवी,भगवान गड,गोपीनाथ गड,अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मगावी जाऊन त्यांना या यात्रेच्या माध्यमातून अभिवादन करणे ओबीसी समाजाला भेटणे आणि झुंड शाही ओबीसी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी च यात्रेचा उद्देश असल्याचे हाके यांनी सांगितले.
उपस्थित ओबीसी बांधवांना संबोधित करताना हाके यांनी राज्यात झुंडशाही करून काही घटक ओबीसींचे आरक्षण मागत आहेत.गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला ओबीसी प्रश्नांची जाणीव नाही ही शोकांतिका असून ओबीसी बांधवांच्या राजकारणातील ५६ हजार जागां या माध्यमातून हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.आरक्षण मागणाऱ्यानी आमच्या ताटातील मागण्यापेक्षा स्वतंत्र मागणी करावी असे सांगून हाके यांनी आता आपल आरक्षण टिकवायचे असल्यास या समाजातील तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले.यावेळी शहरासह तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन संदीप मेहेत्रे यांनी केले.
बारा बलुतेदारांचा बाजार::
लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन यात्रेच्या निमित्ताने स्थानिक ओबीसी बांधवांनी सभा स्थळी १२ बलुतेदार एकत्र करून त्यांचा व्यवसायाचे येथे दर्शन घडविले.हाके, वाघमारे यांनी या प्रत्येक व्यावसायिकांची भेट घेतली.आपल्या भाषणात हाके यांनी या विषयी बोलताना हा समाज आजही आपली समाज व्यवस्था सांभाळून आहे.बलुतेदार, आलुतेदार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहेत या आणि ओबीसीतील सर्व घटक बांधवांसाठी आपल्याला आता एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले.