https://vruttamasternews.com/buldhana-news-38/
सिंदखेडराजा पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरली मोटरसायकल!
हतबल पोलिसांन कडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ
सिंदखेड राजा/प्रतिनिधि
मागील काही दिवसांपासून सिंदखेड राजा शहरात अवैध धंदे वरलि, मटका जुगार अड्डे जोरात सुरु असून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात सातत्याने वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. आता तर या चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. येथिल टी पॉईंटवर स्टेट बँकेच्या वर वाघमारे यांची खोली करून राहनारे प्रा.तायडे दाम्पत्य उत्कर्ष कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात नोकरी करतात त्यांनी आपल्या घरासमोर अकोला पासिंग असलेली दुचाकी नंबर एम एच ३० बीपी ५६४१ उभी केली होती मात्र चोरट्यांनी येथून हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून अतिशय शिताफीने दुचाकी लंपास केली आहे. या घटनेनं सिंदखेडराजा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे, हतबल पोलीसांनी चोरट्याने चोरलेली गाडीची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत तक्रारदारास गाडी शोधण्याचा सल्ला दिलाय, तर घटणा स्टेट बँकेचे सीसी टिव्ही फुटेज मध्ये कैद झालेली असताना कार्यवाही केली नाही.त्यामुळे वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, याच ठिकाणावरून दोन महिन्या अगोदर चारचाकी वाहन चोरले होते, आणि दोन महिन्या नंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणावरून दुचाकी चोरण्याचे धाडस चोराने केले आहे, पोलीसांनकडून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग होत नसल्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना घरा समोर उभी असलेली दुचाकी चोरून नेली.
याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती आहे प्राप्त झाली आहे. विशेष बाब म्हणजे सिंदखेड राजा शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे असूनही हे चोरटे पोलिसांना सापडत नाहीये.
तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा देखील कुठलाही थांगपत्ता लागत नाहीये. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे वाहने चोरत आहेत खुलेआम वरली, मटका जुगार अड्डे चालवत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान सिंदखेड राजा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.