सिंदखेड राजा येथील संत भगवान बाबा कला महाविद्यालयातील प्राचार्या च्या नियमबाह्य नियुक्तीला कुलगुरू चे पाठबळ ? https://vruttamasternews.com/buldhana-news-4/
नियमाची ऐशी तैशी
पवित्र शैक्षणिक क्षेत्रात काय चाललय
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
सिंदखेडराजा शहरातील संत भगवान बाबा कला महाविद्यालयात नियमबाह्य प्राचार्या ची नियुक्ती करून यू जी सी चे नियमा ची ऐशी तैशी करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा कडे अनेक तक्रारी झाल्या असताना सुद्धा कुलगुरू यांनी प्राचार्य यांच्या नियुक्ती कडे डोळेझाक कशी केली अशा प्रकारचा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात उपस्थित होत आहे.
याबाबतीत सविस्तर असे की संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेड राजा या महाविद्यालयात प्राचार्य पदाची जाहिरात जून 2021 मध्ये देण्यात आली होती .विद्यापीठाची निवड समिती जुलै 2021 मध्ये आली व त्या समितीने प्राचार्य पदाची निवड केली .निवड केल्यानंतर पूर्ण वर्षभरानंतर 30 जुलै 2022 रोजी विद्यापीठाने मान्यता दिली . बी ए भाग 2 च्या अतिरिक्त तुकडीस मान्यता नव्हती संलग्नी करणं सुधा नव्हते असे असताना कला शाखेतील महाविद्यालया मध्ये अभियांत्रिकी शाखेतील विनाअनुदानित प्राध्यापक हे प्राचार्य म्हणून नियुक्त केले.अशा ठिकाणी त्यांचा कार्यभार पूर्ण कसा होणार ? पर्यावरण विषयाचे तास त्यांना दाखविले जातात जे कोणत्याही शाखेत भाग 2 ला शिकविल्या जातात परंतु या महाविद्यालयात दुसऱ्या वर्गाची एकच तुकडी अनुदानित आहे तिथे त्यांचा कार्यभार तक्ता शासकीय अनुदानासाठी कसा पूर्ण केल्या जातो ? महाविद्यालयात दुसऱ्या तुकडीला 2022 मध्ये सलग्नीकरण मिळाले परंतु या ठिकाणी नेट सेट ग्रस्त म्हणून काही प्राध्यापकांचा प्रश्न प्रलंबित असताना जिथे कार्यभार पूर्ण होत नाही अश्याच्या नियुक्त्या विद्यापीठाकडून होत आहे .अभियांत्रिकी शाखेतील प्राध्यापक व यू जी सी ह्यांचा त्यांच्या क्षेत्रात कोणताही संबंध नाही त्यांना यू जी सी चे नियम व अटी लागू होत नाही त्यांना (DTE) व ( AICTE) ची पात्रता व नियम लागू असताना त्यांची कला शाखेकडे नियुक्ती व विद्यापीठाची मान्यता कशी? कला शाखे चां अनुदानित महाविद्यालयातील एखादा प्राध्यापक अभियांत्रिकी महाविद्यालयात गेला तर त्याला शासन अनुदान देईल का ? अशा प्रकारची नियमबाह्य नियुक्तीला विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी संमती दिली कशी या प्राचार्य च्या नियुक्ती संदर्भात शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्राध्यापकांच्या भुवया उंचावल्या आहेत .