https://vruttamasternews.com/buldhana-news-40/
नवीन मतदार नोंदणी करून घ्या: ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उद्धव वाकोडे याचे अव्हान
देऊळगाव राजा प्रतीनिधी राजु भालेराव
ज्यांचे नाव अद्यापही नाही त्यांनी मतदार यादीत नावे नोंदवावी असे आव्हान वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी केले आहे दिनांक 25 जून ते 25 जुलै 2024 या कालावधीत प्रशासनाकडून मतदार नोंदणी मोहीम राबवली जात आहे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवं मतदारांनी आपल्या वयाच्या पुराव्यासह इतर कागदपत्रे संबंधित बीएलओ कडे जमा करावी शिवाय ज्या मतदाराचे नाव अन्य कारणामुळे नोंदविण्यात आले नाही त्यांनीही योग्य कागदपत्रे दिलेल्या मुदतीच्या सादर करावी यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावात बीएलओ ची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हहि नाव नोंदणी सुरू झाली आहे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरी जाऊन निवडणुकीच्या संकेतस्थळावर जाऊन मतदान नोंदणी करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उद्धव भाऊ वाकोडे यांनी केले आहे