https://vruttamasternews.com/buldhana-news-43/
केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव साहेब यांचे जावळे परिवाराकडून स्वागत
बुलडाणा /सिद्धार्थ पैठणे
*_हा हात मायाळु..!_
*_हा हात आधारु..!_
बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रिय मंत्री ना.खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची केंद्रात वर्णी लागल्याबदल जावळे परिवाराकडून छत्रपती संभाजीनगर विमान तळावर मंत्री महोदय यांचे जावळे परिवाराकडून स्वागत करण्यात आले…
ना. प्रतापराव जाधव आणि जावळे परिवाराचे सबंध संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.जावळे परिवाराच्या प्रत्येक सुख दुःखात हजर राहून आपुलकीने कुटुबाची विचारपूस करणारे आणि सहाजिकच जावळे कुटुंबाचे आणि जाधव परिवाराचे अगदी दोन पिढ्यांपासून घनिष्ठ संबंध आहेत.
जावळे परिवाराची पार्श्वभूमी ही शेती क्षेत्राशी निगडीत आहे.शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी शेती योजना या सर्व विषयांची चर्चा मा.प्रतापराव जाधव यांच्याशी वेळोवेळी होती.जावळे परिवार सुद्धा तालुक्यात आपल्या नावाचा ठसा उमटून समाजसेवेच्या माध्यमातून लोकांच्या अडी-,अडचणीच्या वेळो-वेळी ना.प्रतापराव जाधव यांच्या कानावर टाकून लोकांच्या कामांसाठी जावळे परिवार धावून जातो.आणि वेळीच प्रश्न सोडवत होते याच आधारावर जावळे कुटुंबाने सुद्धा प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जात लोकांच्या कामासाठी अहोरात्र झटतात. समाजकारणाची आणि विकासाची साथ धरत राजकारणामध्ये जावळे परिवारातील सदस्य शिवसेना तालुका प्रमुख पंजाबराव जावळे,असेल तसेच त्यांचे बंधू सरपंच पती अजाबराव जावळे असेल संपूर्ण जावळे परिवार आपल्या माध्यमातून अनेक विकास कामे सुद्धा माननीय प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये पार पडली.
आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांचा विजय हा कोनड गावातील नागरिकांना मोठा आनंद देणारा आहे.
त्यामुळे दिवसेंदिवस जावळे परिवाराच्या आणि जाधव परिवाराचे संबंध अधिकच घट्ट होत आहे हे दोन्हीही परिवार एकमेकावर निस्वार्थ प्रेम करताना दिसतात..